धुळे - शहरातील अॅक्सिस बँक येथील विकास बँकेचे चालू असलेले खाते हॅक करून ऑनलाइन ट्रांजेक्शनद्वारे कोट्यवधी रुपयांची बँकेची फसवणूक करण्यात आली होती. यात देशातील वेगवेगळ्या ठिकाणी 18 बँकेतील 27 खात्यांवर सुमारे दोन कोटी 6 लाख 50 हजार 165 रुपयांची रक्कम परस्पर वर्ग करून बँकेची फसवणूक झाली. याप्रकरणी धुळे पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले असून, यात एका महिलेचादेखील समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींकडून सुमारे पाच लाख 98 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चिन्मय पंडित - पोलीस अधीक्षक, धुळे तपासासाठी सायबर तज्ज्ञ व्रजेश गुजराती यांची मदत
धुळे शहरातील अॅक्सिस बँक येथील धुळे विकास बँकेचे चालू असलेल्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने 8 जून 2020 रोजी हे खाते हॅक करून ऑनलाइन ट्रांजेक्शनद्वारे देशातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या 18 बँकेतील 27 खात्यांवर सुमारे 2 कोटी 6 लाख 50 हजार 165 रुपयांची रक्कम परस्पर वर्ग करून बँकेची फसवणूक केली होती. या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्याचे आव्हान धुळे पोलिसांसमोर होते. सदर गुन्ह्याचा तपास हा अतिशय क्लिष्ट आणि किचकट असल्याने पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी तपासात मदत व्हावी यासाठी सायबर तज्ज्ञ व्रजेश गुजराती यांची नेमणूक केली होती. तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या मदतीने विशेष सेल स्थापन करून तांत्रिक विश्लेषणासाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून दिली.
27 खाते धारकांची माहिती प्राप्त करणे आव्हानात्मक -
तपासामध्ये सुरुवातीला रक्कम वर्ग झाल्यानंतर 18 बँकेशी संपर्क करून त्यातील 27 खाते धारकांची माहिती प्राप्त खात्यात वर्ग झालेली रक्कम गोठविण्याबाबत संबंधित बँकांना मेलद्वारे आणि प्रत्यक्ष संपर्क करून विनंती करण्यात आली. सुरुवातीला 27 खात्यात पैसे वर्ग केलेल्या ठिकाणी त्या त्या बँकांशी मेलद्वारे तसेच फोनद्वारे संपर्क करून पोलिसांनी 2 कोटी रक्कमेपैकी 88 लाख 81 हजार 173 रुपयांची रक्कम प्राप्त केली आहे.
हेही वाचा -...म्हणून नाशिकच्या सर्व बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद
या प्रकरणातील आरोपीपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्यासाठी पोलिसांनी बँकेकडून संबंधित खात्यांचे खाते उतारे प्राप्त करुन त्याचे विश्लेषण करून त्यामध्ये मिळून आलेले मोबाईल क्रमांक आणि पत्ते पडताळून पाहिले. यावरील मोबाईल नंबर आणि दिलेले पत्ते हे बनावट असल्याचे समोर आले. यातील प्राप्त झालेल्या मोबाईलचे सीडीआर प्राप्त करून मोबाईल धारकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले. त्यापैकी दिल्लीतील एका मोबाईलधारकावर लक्ष केंद्रित करून माहिती प्राप्त करताच पोलिसांनी मोबाईल धारकांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांच्या संपर्कातील सर्वसामान्य धारकांची माहिती प्राप्त केली.
आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक दिल्लीत -
ही टोळी अकाउंट हॅक करण्याचे काम करीत असल्याचा संशय आल्यानंतर धुळे येथील एक पथक दिल्ली येथे पाठवण्यात आले. याप्रकरणी पथकाने 19 ऑक्टोबर 2020 रोजी नवी दिल्ली येथील टिळक नगर येथे राहणाऱ्या नितिका दिपक चित्रा (30) या महिलेला ताब्यात घेऊन तिची विचारपूस केली. यानंतर तिची तसेच आरोपी रमन कुमार याची झाडाझडती घेतली असता, 9 मोबाईल हँडसेट, 2 नोटा मोजण्याचे मशीन, 1 आयपॅड, 1 डिजिटल लॉकर, अॅपलची घड्याळ, 1 सीपीसी व मॉनिटर, 1 कलर प्रिंटर, दोन राउटर एक वायरलेस हॉटस्पॉट विविध बँकांचे एटीएम कार्ड, पासबुक, चेकबुक आधार कार्ड, वेगवेगळ्या कंपनीचे सिम कार्डचे पाच वेगवेगळी नावे असलेले केवायसीचे कागदपत्रे असा एकूण पाच लाख 98 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पाच आरोपींना दिल्लीतून केली अटक
या महिलेकडे अधिक विचारपूस केली असता, तिने तिचा पती दीपक राजकुमार चित्र हा प्रेस नावाच्या नायजेरियन व्यक्तीशी संपर्कात आला असल्याचे सांगितले. ही माहिती दिल्लीतील पथकास पुरवली असता त्यांनी तांत्रिक विश्लेषणद्वारे प्रेस नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली, असता त्याच्या ताब्यात असलेले अलाहाबाद बँकेचे दोन त्यात कॅथोलिक सिरीयन बँकेचे एक असे एकूण तीन एटीएम कार्ड व दोन मोबाईल हँडसेट मिळून आले.
या एटीएम कार्डची माहिती संबंधित बॅंकेकडून मिळवली असता दोन एटीएम कार्ड हे रुस्तम नौबतराम व 1 एटीएम कार्ड हे रणवीर सिंग यांच्या नावे असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर नायजेरियन व्यक्तीच्या ताब्यात मिळून आलेले एटीएम कार्डमधील व्यक्ती रुस्तम नौबतराम अॅक्सिस बँकेच्या अकाउंटमधून ऑनलाइन रक्कम वर्ग झालेल्या 27 खातेधारकांपैकी एक असल्याची खात्री झाली. यानंतर त्याला ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पथक दिल्ली येथून धुळे येथे येत असताना त्याचे साथीदार दीपक राजकुमार चित्रा, रमणकुमार दर्शनकुमार अवतारसिंग वरयाम, हे इंदौर येथे तपास पथकाला स्वतःहून हजर झाले.
याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत दिपक राजकार चित्रा (29, रा. जुने महाविर नगर नवी दिल्ली) नितिका दिपक चित्रा (30, रा जुने महाविर नगर नवी दिल्ली), टोब्या चिकू जोसेफ ओकोरो, रमण कुमार दर्शन कुमार (रा. तीलक नगर नवी दिल्ली) आणि अवतारसिंग उर्फ हॅप्पी वरे आमसिंग (वय 28 रा तीलक नगर नवी दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे.