महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अविष्कार कॉलनीतील घराला आग; आगीत लाखोंचे नुकसान

मध्यरात्री त्यांच्या घरातील एका खोलीत शॉर्ट सर्कीट झाले. त्यामुळे आग लागून बरेच घरगुती साहित्य जळाले आहे. यात पंखे, लाकडी फर्निचर, मेडिकलची पुस्तके, शैक्षणिक साहित्य अशी सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

By

Published : Mar 17, 2021, 8:02 PM IST

घराला आग
घराला आग

धुळे- चाळीगाव रस्त्यावरील अविष्कार कॉलनीत मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एका डॉक्टरांच्या घरी अचानक आग लागली. या आगीत सुमारे एक लाख रूपयांचे घरगुती साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाचा बंब तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने सुदैवाने ही आग जास्त पसरली नाही. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

अविष्कार कॉलनीत प्लॉट क्र. ३५ अ मध्ये प्रा. डॉ. हासीम शेख यांचे वास्तव्य आहे. मध्यरात्री त्यांच्या घरातील एका खोलीत शॉर्ट सर्कीट झाले. त्यामुळे आग लागून बरेच घरगुती साहित्य जळाले आहे. यात पंखे, लाकडी फर्निचर, मेडिकलची पुस्तके, शैक्षणिक साहित्य अशी सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्याचे लक्षात आल्यावर शेख कुटूंबीयांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या अग्निशमन दलाला संपर्क केल्यावर सुमारे दहा मिनिटातच बंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलातील जवानांच्या प्रयत्नामुळे ही आग वेळीच नियंत्रणात आली. तर या घटनेबाबत पोलिस ठाण्यात अग्नि उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details