महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे कोरोना अलर्ट : शिरपूरमध्ये आणखी ७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा 199

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या शिरपूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे प्राप्त २८ अहवालापैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे धुळे जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा आता १९९ वर जाऊन पोहोचला आहे.

कोरोना बधितांचा आकडा 199 वर
कोरोना बधितांचा आकडा 199 वर

By

Published : Jun 5, 2020, 4:48 PM IST

धुळे -जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथील २८ अहवालांपैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात ६ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. यामुळे धुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 199 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये शिरपूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय प्राप्त झालेल्या २८ अहवालांपैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर, फक्त शिरपूर तालुक्यात आतापर्यंत 49 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात पुढील भागातील बधितांचा समावेश आहे. दरम्यान शिरपूर येथे व्यवसाय सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली असून यामुळे अधिक धोका वाढला आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नव्याने सापडलेल्या ७ रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे -

1. ६८ वर्षीय पुरुष, करवंद नाका

2. ३८ वर्षीय पुरुष, करवंद नाका

3. ३५ वर्षीय पुरुष, मारवाडी गल्ली

4. ३० वर्षीय पुरुष, केजी रोड

5. २५ वर्षीय स्त्री, केजी रोड

6. ३४ वर्षीय पुरुष, दादा गणपती गल्ली

7. ५७ वर्षीय स्त्री, माळी गल्ली

धुळे एकूण रुग्ण संख्या - १९९

एकूण मृत्यू - २४

ABOUT THE AUTHOR

...view details