चंद्रपूर:देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले आणि आज त्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या पाच वर्षांपूर्वीच (before the country gained independence) म्हणजे 1942 मध्येच काही दिवसच का होईना पण स्वतंत्र झाले होते,(This place became independent ) असे एक ठिकाण आहे. यासाठी 21 क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा तर 26 जणांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली होती. मात्र, तरीदेखील या असाधारण क्रांतीची दखल देशाच्या इतिहासाने अद्यापही पाहिजे तशी घेतलेली नाही पाहुया चिमुर क्रांतीचा इतिहास (Read History of Chimur Revolution) काय आहे.
गांधीजींचा 'करो या मरो' चा नारा: 8 ऑगस्ट 1942 ला ग्वालिया टँक मैदान, मुंबई येथे महात्मा गांधी यांनी 'भारत छोडो' आंदोलनाच्या माध्यमातून 'करो या मरो' चा नारा दिला. यानंतर गांधीजींच्या संदेशाने सारा देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला होता. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील चिमूर येथे 12 ऑगस्ट पासूनच काहीतरी मोठं घडवून आणण्यासाठी गुप्त बैठका सुरु होत्या. आणि यामागे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भक्कम प्रेरणा होती. त्यांच्या "गुलामी अब नही होना, हमारे प्रिय भारत देश में", " पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना" या प्रकारच्या राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या भजनाने लोकांच्या मनात क्रांतीची ठिणगी यापूर्वीच पडली होती.
तो दिवस उजाडला : मात्र, त्याचा स्फोट व्हायचा होता.अखेर, स्वातंत्र्याचा तो दिवस उजाडला. 16 ऑगस्टच्या सकाळी एक मोठी प्रभातफेरी चिमूर येथे काढण्यात आली. ज्याचे नेतृत्व गोपाळराव कोरेकार करीत होते. "व्हाईसराय दिल्ली में, जुते खाये गल्ली में", या घोषणा देत ही प्रभातफेरी जुन्या बसस्थानकाकडून नाग मंदिराकडे निघाली. कारण, त्यादिवशी नागपंचमीचा दिवस होता. या मोर्चात काँग्रेस सेवादलाचे श्रीराम बिगेवार, सखाराम माट्टेवार, बाबूलाल झिरे, दादाजी किरीमर, मारुती खोबरे, गणपत खेडकर आदी क्रांतिकारक सहभागी झाले होते.