चंद्रपूर : चंद्रपूरात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचलेला ( Human wildlife Animal conflict in Chandrapur ) आहे. यात अनेक लोकांचे बळी जात आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ( Tadoba Andhari Tiger Reserve ) येणाऱ्या धरणावर मासेमारी मासेमारी करणारे अनेक मच्छीमार जातात. मात्र त्यांना जीव मुठीत घेऊन जंगलातून जावे लागते. वाघ नेहमी मागून हल्ला करतो, त्यामुळे मागे मुखवटा लावला तर वाघाला वाटते की आपल्याला समोरून कोणी बघत आहे. असा प्रयोग सुंदरबन येथे केला जात असून यात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना कमी झाल्या ( Human masks keep tigers away )आहेत. हाच प्रयोग ताडोबात करण्यात आला आहे. मासेमारी करणाऱ्या ६० कामगारांना मानवी मुखवटे वाटप करण्यात आले. सोबतच वनलगतच्या मार्गावरुन जाणाऱ्यासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली.
Tadoba Andhari Tiger Reserve : मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ताडोबात नवा उपक्रम; वाचा सविस्तर
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ( Tadoba Andhari Tiger Reserve ) येणाऱ्या धरणावर मासेमारी मासेमारी करणारे अनेक मच्छीमार जातात. मात्र त्यांना जीव मुठीत घेऊन जंगलातून जावे लागते. वाघ नेहमी मागून हल्ला करतो, त्यामुळे मासेमारी करणाऱ्या ६० कामगारांना मानवी मुखवटे वाटप करण्यात आले.
मासेमारांची तात्पुरती वसती : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागूनच इरई धरण आहे. या परिसरात मासेमारांची तात्पुरती वसती उभारण्यात आली आहे. याठिकाणी ६० जण नियमित मासेमारी करतात. या वसती पर्यंत पोहचण्यासाठी वनातून वाट काढावी लागते. त्यामुळे झाडीझुडपात दबा धरुन बसलेल्या जंगली श्वापदांकडून त्यांच्या जीवाला नेहमीच धोका असतो. यापूर्वी वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर या भागात काम करणाऱ्या कामगारांची वन्यजीवांपासून सुरक्षा व्हावी, यासाठी दिवाळी निमित्ताने मोहर्ली बफर वनपरिक्षेत्र अधिकारी मार्फत प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात आली. या अंतर्गत मासेमारी कामगारांना मनुष्य मुखवट्यांचे वाटप करण्यात आले.
ट्रॅक्टरची व्यवस्था :मासेमारीच्या स्थळापर्यंत पोहचण्यासाठी त्यांना ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली. सकाळी सात ते दुपारी दोन या वेळात मासेमारी कामगारांना त्यांच्यास्थळी ट्रॅक्टरमधून पोहचविण्यात आले. त्यामुळे आता या कामगारांना सुरक्षेसह रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यांचे ई-श्रम कार्ड काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. हा योजना ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी पूर्ण केली. मानव -वन्यजीव संघर्ष टाळणे आणि पर्यायाने मासेमारी कामगारांना सुरक्षा प्रदान व्हावी मनुष्य मुखवटे वाटप करण्यात आले, असे थिपे यांनी सांगितले.