चंद्रपूर - संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेली चिमूर येथील श्रीहरी बालाजीच्या घोडा रथयात्रा उत्सवास ३० जानेवारीपासून सुरू झाली आहे. ३९३ वर्षापासून हा ग्रामोत्सव साजरा करण्यात येत आहे. ३ फेब्रुवारीला श्रीहरी बालाजीचे प्रमुख वाहन गरूड, ५ फेब्रुवारीला रात्री ११ वाजता मारोती वाहन प्रदक्षिणा गोविंदा गोंविदाच्या गजरात करण्यात आली.
श्रीहरी बालाजी देवस्थान संस्थान चिमूरद्वारा दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या यात्रा उत्सवाची सुरुवात वसंत पंचमी ३० जानेवारीपासून करण्यात आली. मिती माघ शुद्ध नवमी ३ फेब्रुवारीला गरुड वाहन आणि मिती माघ शुद्ध ५ फेब्रुवारीला मारोती वाहन हरी भक्त पारायण विनोद बुवा खोंड महाराज यांच्या नारदीय किर्तनानंतर श्रीहरी बालाजी देवस्थानातून काढण्यात येऊन गावातील मुख्य मार्गावरून प्रदक्षिणा टाकण्यात आली. आता या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे ७ फेब्रुवारीला होणारी घोडा रथ यात्रा.
श्रीहरी बालाजी देवस्थान यात्रा हेही वाचा- 'खरा हिंदू मैदान सोडून पळून जात नाही, अमित शाह मैदान सोडून पळाले'
हेही वाचा- रणजीत बच्चन यांच्या हत्येचे रहस्य उलगडले, पत्नीनेच रचला होता कट
पुराणातील आख्यायिकेनुसार श्रीहरी बालाजी म्हणजेच विष्णुचे आवडते वाहन गरूड आहे. श्रीहरी बालाजीच्या भ्रमणापुर्वी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गरुडास पाठवले जाते. गरूड आकाशमार्गे प्रदाक्षणा करून श्रीहरीस भ्रमण करण्यास योग्य वातावरण असल्याची सुचणा देतात. त्यानंतर मारोतीला वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी पाठवले जाते. त्यानंतर मारोतीसुद्धा श्रीहरीस भ्रमण करण्यास सुयोग्य वातावरण असल्याचे संदेश देतात त्याप्रमाणे श्रीहरी बालाजी भ्रमणास निघतात.
पुराणातील आख्यायिके नुसार देवस्थान समीतीकडून गरूड आणी मारोती वाहनाच्या प्रदक्षणाचे वेदमंत्राने आयोजन केले जाते. ७ फेब्रुवारीला श्रीहरी बालाजी महारांजांची अश्वारूढ रथ यात्रा निघणार आहे. जागृत देवस्थान म्हणून मान्यता असलेल्या श्रीहरी बालाजींच्या घोडा रथयात्रेला विदर्भासोबतच , संपूर्ण महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि तिरूपती येथील भावीक दर्शनाकरीता येतात.