चिमूर (चंद्रपूर) - तालुक्यातील भीसी ग्रामपंचायत मधील कामात ई टेंडरिंगची प्रक्रिया योग्यरित्या न राबविल्याचा ठपका ठेऊन ग्रामसेवकाला निलंबीत करण्यात आले होते. या चौकशीतून नाव कमी करण्यासाठी ३० हजार रूपयांंची लाच मागितल्या प्रकरणी विस्तार अधिकारी, भिसीचे सरंपच व उप सरपंचाना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
दुकान गाळे बांधकामाची ई-टेंडरिंग प्रक्रिया योग्य न राबविल्याचा ठपका ठेवत तक्रारदाराला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी विस्तार अधिकारी हेमंत हुमणे (वय ५५ वर्षे)यांच्या मार्फत सुरू होती. या चौकशीतून नाव कमी करण्यासाठी हुमणे यांनी निलंबीत ग्रामसेवकाकडे ३० हजार रूपयांंची मागणी केली. तर सरपंच योगीता अरूण गोहणे (वय ३४ वर्षे), उपसरपंच लिलाधर प्रभाकर बन्सोड (वय ४५ वर्षे) यांनी प्रेरीत केले.