महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 5, 2022, 11:50 PM IST

ETV Bharat / state

Tadoba New Covid Guidelines : ताडोबात यायचे असेल तर हे नियम पाळा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवे नियम

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला (Tadoba Andhari Tiger Reserve) भेट देण्याकरिता मोठ्या प्रमाणात पर्यटक (Tourist) येतात. मात्र, जंगल सफारी करत असताना कोविड अनुरूप वर्तनाचे पालन होत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली (New Guidelines in Tadoba) लागू केली आहे.

tourist
ताडोबात पर्यटक

चंद्रपूर - जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला (Tadoba Andhari Tiger Reserve) भेट देण्याकरिता मोठ्या प्रमाणात पर्यटक (Tourist) येतात. मात्र, जंगल सफारी करत असताना कोविड अनुरूप वर्तनाचे पालन होत नाही. यातून कोविड-१९ विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाकरीता ७ जानेवारीपासून अंशत: निर्बंध (Restrictions in Tadoba) लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

हे आहेत नवीन नियम -

पर्यटक, निसर्ग मार्गदर्शक, गेट मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी लसीकरण केलेले असावे. अन्यथा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. एकाच कुटुंबातील किंवा सोबत प्रवास करणारे, सोबत राहणारे पर्यटकांना प्रचलित नियमानुसार (सहा पर्यटक प्रती जिप्सी वाहन) सफारी करता येईल. इतरांसाठी चार पर्यटक प्रती जिप्सी वाहन यानुसार मर्यादेत सफारी करता येईल. कोअर क्षेत्रातील पर्यटन हे मंगळवार व बफर क्षेत्रातील पर्यटन हे बुधवार या दिवशी पूर्वीपासूनच बंद ठेवण्यात आलेले आहे. सर्व प्रवेशव्दारांवर सामाजिक अंतर कटाक्षाने पाळण्यात यावे. पर्यटन प्रवेशव्दारांवर गर्दी होऊ नये, याकरीता दोन वाहनांमध्ये किमान १५ फुट अंतर ठेवण्यात यावे. शिवाय पर्यटकांना प्रवेश देतांना वाहनांना प्रचलित वेळेच्या अर्धा तास आधी प्रवेश व अर्धा तास आधी बाहेर निघण्याची मुभा राहील. त्यानुसार प्रवेशाकरीता स्लॉटची आखणी करण्यात येईल. जेणेकरून प्रवेशव्दारावर कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही.

तसेच प्रवेशव्दारासमोर जिप्सी वाहनाकरीता रस्त्यावर खुणा करण्यात येईल. सफारी दरम्यान व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रातसुद्धा वाहनांची गर्दी रोखण्यात यावी. उल्लंघन केल्यास संबंधित जिप्सीचालक तसेच पर्यटकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. सफारीनंतर पर्यटक, मार्गदर्शक यांनी प्रवेशव्दारावर थांबून गर्दी करणे प्रतिबंधित राहील. तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. राज्य शासन तसेच या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details