महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार किशोर जोरगेवार यांचा मनपाला 1 कोटीचा निधी; 100 खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्याचे निर्देश

चंद्रपुरात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने प्रशासनाला योग्य मार्गदर्शक सूचना केल्या जात आहे. त्यांच्या निर्देशानंतर आयुर्वेदिक रुग्णालयही कोविडकरिता सुरू करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.

आमदारांची आढावा बैठक
आमदारांची आढावा बैठक

By

Published : Apr 17, 2021, 7:27 PM IST

चंद्रपूर - महानगरपालिका हद्दीत रुग्णसंख्या वाढत असतानाही मनपा प्रशासनाने निधी नसल्याचे कारण समोर करत कोणतीही उपाययोजना केली नाही. मनपा प्रशासनाने आतापर्यंत कोविड रुग्णालये सुरू करणे अपेक्षित होते. मात्र ते सुरू झाले नाही. परिणामी रुग्णांचे हाल होत आहे. ही बाब लक्षात घेता आज (शनिवार) आमदार किशोेर जोरगेवार यांनी महानगर पालिकेत बैठक घेत उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी निधीच्या कमतरतेचे कारण समोर येताच जोरगेवार यांनी आमदार विकास निधीतून 1 कोटी रुपयांचा निधी मनपा प्रशासनाला दिला. या निधीतून अत्याधुनिक कोविड रुग्णालय उभारण्याच्या सूचना केल्या आहे. यावेळी मनपाचे आरोग्य अधिकारी अविश्कार खंडारे यांचीही उपस्थिती होती.

चंद्रपुरात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने प्रशासनाला योग्य मार्गदर्शक सूचना केल्या जात आहे. त्यांच्या निर्देशानंतर आयुर्वेदिक रुग्णालयही कोविडकरिता सुरू करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. तसेच नुकतीच त्यांनी रामनगर चौकातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देत येथील 30 खाटा कोरोना रुग्णांसाठी सुरू केल्या आहे. मात्र यात मनपा प्रशासनाचेही मोलाचे योगदान असणे गरजेचे असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले. कोरोना काळात मनपा प्रशासनाकडून अपेक्षित अशी कोणतीही उपायोजना करण्यात आलेली नाही. परिणामी महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा अधिक उद्रेक होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी 1 कोटी रुपयांचा निधी कोविड रुग्णालय उभारण्यासाठी मनपा प्रशासनाला दिला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार निधीतील 1 कोटी रुपये कोरोनावर खर्च करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यांनतर हे संपूर्ण 1 कोटी रुपये आमदार किशोर जोरगेवार यांनी 100 खाटांच्या कोविड रुग्णालयासाठी मनपाला हस्तांतरीत केले आहे. या निधीतून सर्व सोयी सुविधांनी सज्ज असे अत्याधूनिक कोविड रुग्णालय तयार करुन येथे आक्सिजन, व्हेंटिलेटर, अत्यावश्यक औषधी उपलब्ध करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त यांना केल्या आहे. मनपा आयुक्तांनीही यावर लवकर कार्यवाही करत मनपाच्या रैन बसेरा येथे हे रुग्णालय तत्काळ सुरू करण्याचे आश्वस्त केले आहे. मनपाकडे रुग्णायल सुरू करण्यासाठी इमारत आहे. त्यातच त्यांच्याकडे स्वताची स्वतंत्र आरोग्य व्यवस्थाही आहे. कोरोना रुग्णालयासाठी या जमेच्या बाजू असून सदर निधीचा योग्य उपयोग करुन महानगर पालिकेने लवकर कोविड रुग्णालय सुरू करावे, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details