महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोलारा परिसरात वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एक ठार; दोन दिवसांनी मिळाला मृतदेह

जग प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठया प्रमाणात वाढली असुन त्यांना वनक्षेत्र कमी पडत आहे. ज्यामूळे वन्यप्राणी व मानवी संघर्ष वाढला आहे.

By

Published : Jun 7, 2020, 2:18 PM IST

वाघ
संग्रहित छायात्रित

चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील कोलारा परिसरात वाघाच्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी समोर आली. राजेश्वर दडमल असे मृताचे नाव आहे. राजेश्वर हा दोन दिवसांपासून बेपत्ता होता. आज त्याचा मृतदेह आढळून आला आहे. कोलारा परिसरात वाघाचा वावर आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागूनच हा परिसर आहे.

राजेश्वर हा दोन दिवसांपूर्वी जंगलात गेला होता. मात्र, तो दोन दिवस होऊनही तो परत आल्याने गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. आज त्याचा मृतदेह जंगलात आढळून आला आहे. त्याच्या शरीराचा बहुतांशी भाग हा वाघाने खाल्लेल्या अवस्थेत होता. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

मार्च महिन्यापासुन ते 4 जूनपर्यंत दोन महिला व दोन पुरुषांना वाघाने ठार केले आहे. आज ही संख्या 5 वर पोहोचली आहे. जग प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांना वनक्षेत्र कमी पडत आहे. ज्यामूळे वन्यप्राणी व मानवी संघर्ष वाढला आहे.

मार्च महिन्यात कोलारा येथील बालाजी वाघमारे, ८ एप्रिलला मोहफुल वेचणाऱ्या सातारा येथील यमूना पांडुरंग गायकवाड, १९ मे ला तेंदुपत्ता तोडायला गेलेल्या कोलारा येथील लिलाबाई चंद्रभान जीवतोडे, ४ जूनला स्वतःच्या शेतात कुंपन करण्याकरीता गेलेले बामनगाव येथील राज्यपाल दयाराम नागोसे असे चार बळी वाघाने घेतले होते. आज राजेश्वर यांचा पाचवा बळी गेला आहे.

तीन महिन्यात वाघाने पाच बळी घेतल्याने सर्वत्र दहशत पसरली असून वन विभागाविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. वाघाचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावे जेणेकरून शेतीचे कामे करता येतील, अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details