चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील बंदर शिवापूर येथे बंदर कोल ब्लॉकच्या लिलाव प्रक्रियेला शासनाकडून गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे जंगल, जमीन, वन्यप्राण्यांवर होणारा वाईट परिणाम लक्षात घेता सर्व स्तरांतून विरोध दर्शवण्यात येत आहे. आता यासाठी मनसे मैदानात उतरली आहे. केंद्र शासनाच्या या धोरणाचा निषेध करत बंदर कोल ब्लॉकला लिलाव प्रक्रियेतून रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रस्तावित 'बंदर कोल ब्लॉक' विरोधात मनसे मैदानात; पर्यावर मंत्री प्रकाश जावडेकरांना निवेदन
चिमूर तालुक्यातील बंदर शिवापूर येथे बंदर कोल ब्लॉकच्या लिलाव प्रक्रियेला शासनाकडून गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे जंगल, जमीन, वन्यप्राण्यांवर होणारा वाईट परिणाम लक्षात घेता सर्व स्तरांतून विरोध दर्शवण्यात येत आहे. आता यासाठी मनसे मैदानात उतरली आहे.
ताडोबा बफर झोनच्या सिमेला लागून असलेला कोळसा ब्लॉक लिलाव रद्द करण्यासाठी मनसेने शिवापूर बंदर येथील प्रस्तावित कोल कंपनी परीसरात आंदोलन केले. यामध्ये वाघ आणि जंगल वाचवण्याचे आवाहन मनसेमार्फत कऱण्यात आले. उद्योगपतींना मदत करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
मनसे तर्फे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिलाव रद्द करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केली. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष नगरसेवक सचिन भोयर,जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, शहर अध्यक्ष मनदिप रोडे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड उपस्थित होते.