चंद्रपूर - राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यासाठी कार्यकर्ते रात्रंदिवस एक करत प्रचार करीत आहेत. त्यामुळे त्यांना कुठेतरी विसावा घेण्याची गरज असते. अशाच प्रकारे उमेदवार धनराज मुंगले आणि कार्यकर्ते रस्त्याच्या बाजुला गाडी थांबवून विसावा घेतात. तसेच वनभोजनाचा आनंद देखील घेत असल्याचे पाहायला मिळाले.
चंद्रपुरात प्रचाराच्या रणधुमाळीत कार्यकर्त्यांसह उमेदवाराचा वनभोजनासाठी विसावा
मानवी नैसर्गिक गरजांची पुर्तता वेळेवर झाली नाही तर शरीराची कार्यक्षमता कमी होते. मात्र, निवडणूक काळात युद्ध पातळीवर प्रचाराचा धुमधडाका असतो. बहुतेक कार्यकर्ते आणि उमेदवार हॉटेल, खानावळ येथे अथवा आपल्या कार्यकर्त्यांकडे भोजन करीत असतात.
मानवी नैसर्गिक गरजांची पुर्तता वेळेवर झाली नाही तर शरीराची कार्यक्षमता कमी होते. मात्र, निवडणूक काळात युद्ध पातळीवर प्रचाराचा धुमधडाका असतो. बहुतेक कार्यकर्ते आणि उमेदवार हॉटेल, खानावळ येथे अथवा आपल्या कार्यकर्त्यांकडे भोजन करीत असतात. यासाठी वेळेचा, पैशाचा अपव्यय होतो. कार्यकर्त्यांकडे याची सोय केल्यास त्याचा भुर्दंड त्यांना सोसावा लागतो. यावर उपाय म्हणून उमेदवार आपल्या ताफ्यातील कार्यकर्ता व स्वतः साठी भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी रस्त्याच्या कडेला गाड्या थांबवून वनभोजनाचा आनंद घेत असतात.