चंद्रपूर - राजुरा येथील साईनगर येथे शॉर्टसर्किटमुळे एका घराला आग लागली. नागरिकांच्या सतर्कतेने ही आग विझवण्यात आली आहे. आगीमुळे घराचे लाखोंचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.
राजुरा येथे शॉर्टसर्किटमुळे आग, लाखोंचे नुकसान
सकाळी ११ च्या सुमारास घरमालकांना ज्ञानेश्वर चौखे याच्या घरातून धूर निघत असल्याचे लक्षात आले. थोड्या वेळातच धुराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसताच त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले. त्यांना ज्ञानेश्वर चौखे ह्यांच्या घरात आग लागल्याचे दिसून आले.अग्नीशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
साई नगर येथील रामदास पडवेकर यांच्या घरी भाड्याने ज्ञानेश्वर चौखे राहातात. ते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी आहेत. ते कुटुंबीयांसह बाहेर गावी गेले आहेत. आज सकाळी ११ च्या सुमारास घरमालकांना ज्ञानेश्वर चौखे याच्या घरातून धूर निघत असल्याचे लक्षात आले. थोड्या वेळातच धुराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसताच त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले. त्यांना ज्ञानेश्वर चौखे ह्यांच्या घरात आग लागल्याचे दिसून आले.
या बाबत नगर पालिकेच्या अग्नीशमन दलाला कळविण्यात आले. माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहचले. त्याचबरोबर विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आगीत ज्ञानेश्वर चौखे यांचे मोठे नुकसान झाले आहे.