महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात बोअरवेलच्या पाण्यात आढळला एक फुटाचा जंतू

गोंडपिपरी तालुक्यातील चक गोजोली येथील बोअरवेलमधून गढूळ पाणी येत आहे. जवळपास गावातील पाचशे नागरिक या बोअरवेल मधील पाण्याने तहान भागवितात. आज पाणी भरताना नारु सदृश्य जंतू आढळून आला.

By

Published : Nov 9, 2019, 7:31 PM IST

बोअरवेलच्या पाण्यात आढळला एक फूटाचा जंतू

चंद्रपूर - जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या गोजोली गावातील बोअरवेलच्या पाण्यात एक फुटाचा नारू सदृश्य जंतू आढळून आला आहे. गावात पिण्याचा पाण्याच्या इतर सुविधा नसल्याने बोअरवेलच्या गढूळ पाण्यावर गावाकरी तहान भागवित आहेत. त्यामुळे गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे.

बोअरवेलच्या पाण्यात आढळला एक फूटाचा जंतू

हेही वाचा-Ayodhya Judgment: 'निकाल जय-पराजयाच्या भावनेतून पाहू नका, राम-रहीम भक्तीपेक्षा भारतभक्तीची ही वेळ - पंतप्रधान

गोंडपिपरी तालुक्यातील चक गोजोली येथील बोअरवेलमधून गढूळ पाणी येत आहे. जवळपास गावातील पाचशे नागरिक या बोअरवेल मधील पाण्याने तहान भागवितात. आज पाणी भरताना नारू सदृश्य जंतू आढळून आला. जवळपास एक फूट लांबीचा हा जंतू आहे. या बोअरवेल मधील पाणी नागरिक पिण्यासाठी वापरत असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details