चंद्रपूर - जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या एका वाघाला ( Forest Department Caught Tiger ) आणि एक बिबट्याला जेरबंद ( Forest Department Caught Leopard In Chandrapur ) करण्यात वनविभागाला यश आले. एक वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. सावली तालुक्यात मागील वीस दिवसांपासून वाघाने धुमाकूळ ( Found One Tigress Dead In Chandrapur ) घातला होता. त्यामुळे या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभाग कामाला लागला होता. वाघाला जेरबंद करण्यासाठी २५ कर्मचारी दिवसरात्र गस्त घालीत होते. अशातच आज सकाळी सकाळी साडे सात वाजता शार्पशूटरने वाघास बेशुद्ध करून जेरबंद केले.
पकडलेल्या वाघाने एका व्यक्तीचा घेतला बळीसावली तालुक्यात गेल्या 20 दिवसापासून एका वाघाने ( Tiger Attack On Man In Chandrapur ) धुमाकूळ घातला होता. यात या वाघाने निलसनी-पेठगाव येथील कैलास गेडेकर याचा बळी घेतला होता. वाघाने व्यक्तीचा बळी घेतल्याने परिसरात दहशत पसरली होती. त्यामुळे सावली तालुक्यातील नागरिक प्रचंड दहशतीत वावरत होते. अखेर आज या वाघाला जेरबंद करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.