चंद्रपूर - चिमूर मतदारसंघात भाजप उमेदवाराने ईव्हीएममध्ये छेडछाड केल्यानेच त्याचा विजय झाल्याचा आरोप इतर उमेदवारांनी केला. सर्व उमेदवारांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हा आक्षेप घेतला. मतमोजणीच्या दिवशी सात फेरीनंतर काँग्रेस आघाडीवर होती. त्यानंतर भाजप उमेदवाराचा भाऊ मतमोजणी कक्षात मोबाईल घेवून आला. तेव्हापासूनच मते वळवण्याचे काम झाले, असा संशय इतर उमेदवारांनी व्यक्त केला.
कपाटाला मिळणारी ३० हजार, सिलेंडरला मिळणारी ५० हजार आणि बादलीला मिळणारी २५ हजार मते मोबाईल अॅपच्या माध्यमातून कमळाला वळवण्यात आल्याचा आरोप केला आहे. पुन्हा व्हीव्हीपॅट स्लीपची मतमोजणी करण्यात यावी. या प्रक्रियेला लागणारा खर्च आम्ही देण्यास तयार आहेत, असे या तक्रारदार उमेदवारांनी निवडणूक आयोगास कळवले. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही मागणी नाकारली.