नागपूर/चंद्रपूर - 2015 पासून सुरू असलेली चंद्रपूर जिल्ह्यात असलेली दारूबंदी अखेर उठवण्याचा मोठा महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सनदी अधिकारी झा समितीच्या अहवालावरून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली. ते नागपुरात विभागीय आयुक्त कार्यालयात बोलत होते.
1 एप्रिल 2015ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा मोठा निर्णय राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला होता. देवतळे समितीच्या अहवालावरून हा निर्णय घेण्यात आला होता. यात आघडी सरकार आल्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती झाल्यानंतर अडीच लाखा पेक्षा जास्त लोकांची निवेदने दारूबंदी उठवण्यासाठी आली होती.
'झा समितीच्या अहवालावरून दारू बंदी उठली'
यात सनदी अधिकारी झा यांच्या नेतृत्वात समिती तयार करून अहवाल मागवला होता. या अहवालात अवैध दारू विक्रीत वाढ झाली, क्राईमच्या घटनेत वाढ झाल्याचे पुढे आले. यात 4 हजार 42 गुन्हे हे महिलांवर दाखल झाले आहे. 300पेक्षा जास्त दारू विक्रीचे गुन्हे बालकांवर दाखल झाले होते. या सगळ्या धक्कादायक बाबी झा समितीच्या अहवालात पुढे आल्या आहेत. यासोबत अनेक दुष्परिणामसुद्धा दसरूबंदी नंतर पुढे आले असल्याचेही ते म्हणाले. अवैध दारूमुळे धोका निर्माण झाला होता.
'केंद्रासरकार महाराष्ट्रासोबत सापत्न वागणूक करत आहे'