महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लिपिकावर हल्ला करून 'तो' स्वतःच झाला पोलीस ठाण्यात हजर

उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या लिपिक सुभाष कानोजवार यांच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करून राजू अतकरे हा व्यक्ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.

जखमी सुभाष कानोजवार
जखमी सुभाष कानोजवार

By

Published : Jan 6, 2020, 9:06 AM IST

चंद्रपूर-उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या लिपिकावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना राजूरा तालूक्यातील चुनाळा येथे घडली. सुभाष कानोजवार, असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. जखम गंभीर असल्याने कानोजवार यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, हल्ला केल्यानंतर आरोपी राजू अतकरे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.

राजूरा उपविभागीय कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असलेले सूभाष कानोजवार हे चुनाळा मार्गावरील चौपाटीवर थांबले होते. याच परिसरात राजू अतकरे यांचे सलुनचे दुकान आहे. अचानकपणे अतकरे यांनी सुभाष कनोजवार यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने सपासप वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना काही उपस्थितांनी ग्रामीण रुग्णालयात हलविले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कनोजवार यांना उपचारासाठी तातडीने वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. दरम्यान, आरोपी राजू अतकरे यांने स्वतः पोलीस ठाणे गाठत गुन्हाची माहिती आणि कबुली दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक झुरमुरे, पोलीस कर्मचारी साईनाथ आत्राम, नरोटे करीत आहे.

हेही वाचा - मुकबधीर शाळा झाली स्मार्ट; हावभाव भाषा विकास तंत्राचे चंद्रपूरमध्ये उद्घाटन

ABOUT THE AUTHOR

...view details