चंद्रपूर -जिल्ह्यात मागील 24 तासात 631 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 1 हजार 213 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. 22 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 43 हजार 444 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 31 हजार 281 झाली आहे. सध्या 11 हजार 541 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 32 हजार 411 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 81 हजार 856 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 622 बाधितांचे मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत 622 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 573, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 20, भंडारा 3, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
सोमवारी बाधीत आलेल्या 1213 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालीका क्षेत्रातील 302, चंद्रपूर तालुका 70, बल्लारपूर 58, भद्रावती 86, ब्रम्हपुरी 148, नागभिड 25, सिंदेवाही 34, मूल 45, सावली 13, पोंभूर्णा 8, गोंडपिपरी 16, राजूरा 102, चिमूर 93, वरोरा 157, कोरपना 30, जीवती 13 व इतर ठिकाणच्या 13 रुग्णांचा समावेश आहे.