महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

24 तासात 342 कोरोनामुक्त;177 पॉझिटिव्ह तर 5 मृत्यू

चंद्रपूर येथे गत 24 तासात जिल्ह्यात 342 रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, तर 177 रूग्ण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 5 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.

चंद्रपूर कोरोना अहवाल
चंद्रपूर कोरोना अहवाल

By

Published : Jun 4, 2021, 12:29 PM IST

चंद्रपूर - गत 24 तासात जिल्ह्यात 342 रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, तर 177 रूग्ण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 5 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.

चंद्रपूर कोरोना अहवाल

आज 177 रुग्ण बाधित
आज एकूण 2723 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 177 पॉझिटिव्ह तर 2546 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. बाधित आलेल्या 177 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 54, चंद्रपूर तालुका 21, बल्लारपूर 28, भद्रावती 27, ब्रम्हपुरी 3, नागभिड 0, सिंदेवाही 0, मूल 9, सावली 1, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 4, राजूरा 8, चिमूर 2, वरोरा 5, कोरपना 6, जिवती 5 व इतर ठिकाणच्या 3 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील 43 वर्षीय महिला, भद्रावती तालुक्यातील नेताजी नगर येथील 57 वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील 40 वर्षीय महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील 59 वर्षीय पुरुष तर वणी-यवतमाळ येथील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 83 हजार 228

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 83 हजार 228 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 79 हजार 813 झाली आहे. सध्या 1 हजार 945 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 79 हजार 12 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 93 हजार 89 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1470 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1361, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 38, यवतमाळ 51, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

प्रशासनाचे आवाहन

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा. स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

हेही वाचा- चहासाठी कायपण! तलफ भागवण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह पोहोचला एकाच्या घरी

ABOUT THE AUTHOR

...view details