महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात २२३ नवे कोरोनाबाधित; तीन मृत्यू , एकूण अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 1859

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 103 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 223 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे.

ew corona positive in Chandrap
ew corona positive in Chandrap

By

Published : Mar 27, 2021, 10:23 PM IST

चंद्रपूर -जिल्ह्यात मागील 24 तासात 103 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 223 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार 924 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 645 झाली आहे. सध्या 1,859 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 68 हजार 393 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 36 हजार 611 नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यामध्ये सावरगाव, सिंदेवाही येथील 58 वर्षीय पुरूष, चंद्रपूर शहरातील 60 वर्षीय व 65 वर्षीय पुरूषांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 420 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 381, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आलेल्या 223 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 72, चंद्रपूर तालुका 21, बल्लारपूर 14, भद्रावती 17, ब्रम्हपुरी सात, नागभिड 18, सिंदेवाही चार, मूल 10, सावली दोन, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी एक, राजूरा नऊ, चिमूर 11, वरोरा 25, कोरपना पाच व इतर ठिकाणच्या सहा रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details