मुंबई - सोफिया महाविद्यालयातील निशका नरेश हसनगडी ही विद्यार्थिनी बारावीची परीक्षा आयपॅडवर देणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच तिला एक लेखनिकही देण्यात आला आहे.
मुंबईतली निशका आयपॅडवर देणार बारावीची परीक्षा
मुंबई विभागातून १ हजार ८५५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
राज्यभरात आजपासून १२ वीची परीक्षा सुरू होणार आहे. निशका दिव्यांग असून तिला लहानपणापासूनच लिहिता येत नाही. तिने दोन वर्षांपूर्वीही दहावीची परीक्षा आयपॅडवर दिली होती. यावेळीही निशकाआयपॅडवर उत्तर लिहिणार असून, एक लेखनिक आयपॅडवर टाईप केलेले उत्तर उत्तरपत्रिकेवर लिहणार आहे. त्यानुसार मंडळाने या विद्यार्थिनीच्या परीक्षेबाबतची माहिती परीक्षा केंद्राकडे पाठविली असून, योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेशही दिले आहेत.
उद्या होत असलेल्या परीक्षेला अध्यन अक्षम, दिव्यांग आदीतील तब्बल मुंबई विभागातून १ हजार ८५५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विशेष विद्यार्थ्यांना परीक्षेत समान संधी मिळावी, या उद्देशाने राज्य शिक्षण मंडळाकडून संगणक पुरविणे, अतिरिक्त वेळ देणे आणि लेखनिक पुरविणे, अशा विविध सुविधा दिल्या जात आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे.