महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वैचारिक मतभेद असले तरी राष्ट्रच्या हितासाठी आम्ही एकच - जितेंद्र आव्हाड

सरकारने अधिवेशनात अभिनंदन यांच्या सुटकेचा ठराव करुन तो राष्ट्रपतींकडे पाठवावा. शेवटी वैचारीक मतभेद असले, तरी राष्ट्रहितासाठी आम्ही सर्व एकच आहोत, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड

By

Published : Feb 28, 2019, 3:23 PM IST

मुंबई - पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या अभिनंदन वर्धमान यांच्यासाठी घराघरात प्रार्थना करण्यात येत आहेत. सरकारने अधिवेशनात अभिनंदन यांच्या सुटकेचा ठराव करुन तो राष्ट्रपतींकडे पाठवावा. शेवटी वैचारीक मतभेद असले, तरी राष्ट्रहितासाठी आम्ही सर्व एकच आहोत, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

भारतीय हवाई दलाचे पायलट अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारतभर प्रार्थना करण्यात येत आहेत. विधीमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. याविषयी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मत व्यक्त केले आहे. विधीमंडळ हे लोकशाहीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये आम्ही सर्व पक्षाचे प्रतिनिधी एक आहोत. वैचारीक मतभेद असले तरी राष्ट्रहितासाठी आम्ही सर्व एक असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details