महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येणाऱ्या विधानसभा निवडणुका सोबत लढणार - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

येत्या विधानसभा निवडणुका आम्ही सोबतच लढणार आहोत. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतही आमची महाविकास आघाडीमधील घटक पक्षांशी ट्युनिंग चांगली आहे, असे सांगून मंत्री थोरात यांनी पटोले यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या स्वबळाच्या नाऱ्यावर पूर्णविराम दिला.

Assembly election Thorat reaction
शिवशंकरभाऊ पाटील कुटुंबीय भेट थोरात

By

Published : Aug 21, 2021, 4:32 PM IST

Updated : Aug 21, 2021, 5:25 PM IST

बुलडाणा - येत्या विधानसभा निवडणुका आम्ही सोबतच लढणार आहोत. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतही आमची महाविकास आघाडीमधील घटक पक्षांशी ट्युनिंग चांगली आहे, असे सांगून राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या स्वबळाच्या नाऱ्यावर पूर्णविराम दिला.

माहिती देताना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

हेही वाचा -नवनीत राणांना नेहमी वायफळ बोलायची सवय -यशोमती ठाकूर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रत्येक कार्यक्रमांमध्ये येत्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा देत आहे. अशा वेळेस त्यांची ही भूमिका पक्षाचीही आहे का? असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता त्यांनी उपरोक्त उत्तर दिले. थोरातांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील निवडणूक लढण्यासाठी अनेक इच्छुक असणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. ते शनिवारी बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात पत्रकारांशी बोलत होते.

भाजपच्या यात्रेने काहीच फरक पडणार नाही - थोरात

भारतीय जनता पक्षाने जनआशीर्वाद यात्रा काढली आहे. भाजपचे मंत्री राज्यभर फिरत आहेत. मात्र, जनतेला महाविकास आघाडीचे काम आवडले आहे, त्यामुळे अशा यात्रांनी काहीच फरक पडणार नसून गंगेचे जे हाल यांनी केलेते ते पाहून त्यांना जनतेने आशीर्वाद का द्यावेत ? असा प्रश्न पडलेला असून महाविकास आघाडीलाच महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद आहे. असा दावा काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

थोरात हे श्री. गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक दिवंगत शिवशंकरभाऊ पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेटीला शेगावला आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

केंद्राने बैलबंडी शर्यतीवरील बंदी उठवावी

बैलांच्या शर्यती व्हायला हव्या. बैलबंडी शर्यतीवरील बंदीचा निर्णयाचा केंद्राने फेरविचार करावा. या शर्यतीमुळे ग्रामीण भागात एक उत्साहाचे वातावरण असते. त्या काळातील परिस्थिती पाहून बंदीचा निर्णय झाला असेल, पण आता सरकार तर भाजपची आहे, त्यामुळे त्यांनी बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी थोरात यांनी केली.

यंदा रेडीरेकनरचे दर वाढण्याची शक्यता

रेडीरेकनरवर भाष्य करताना थोरात यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून रेडीरेकनरचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे यंदा हे दर वाढण्याची शक्यता आहे. मात्र, ज्या ठिकाणी जमिनीचे दार कमी झालेत, त्या ठिकाणीच दर कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे थोरात म्हणाले.

हेही वाचा -बुलडाणा : समृद्धी महामार्गच्या कामासाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या टिप्परचा अपघात; 13 मजूरांचा मृत्यू

Last Updated : Aug 21, 2021, 5:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details