महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोताळ्यात पॉझिटिव्ह आलेला तो स्वॅब कोणाचा ? आरोग्य विभाग संभ्रमात

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील कोविड सेंटरमधून अजबच प्रकार शुक्रवारी समोर आला आहे. स्वॅब न देताच एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेला अहवाल कोणाचा आहे. हे मोताळा तालुका अधिकारी राजेंद्र पुरी यांच्यासह संपूर्ण आरोग्य विभागाला कळेनासे झाले आहे.

Whose swab is corona positive in malola
Whose swab is corona positive in malola

By

Published : Mar 6, 2021, 8:30 PM IST

Updated : Mar 6, 2021, 8:37 PM IST

बुलडाणा -जिल्ह्यातील मोताळा येथील कोविड सेंटरमधून अजबच प्रकार शुक्रवारी समोर आला आहे. स्वॅब न देताच एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेला अहवाल कोणाचा आहे. हे मोताळा तालुका अधिकारी राजेंद्र पुरी यांच्यासह संपूर्ण आरोग्य विभागाला कळेनासे झाले आहे. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती शहरभर फिरत असून तो कोण आहे, याबाबत आरोग्य विभागाकडे याचे उत्तर नसून फक्त चौकशी केली जात आहे.

तालुका आरोग्य अधिकारी पुरी यांची आता दुसरी प्रतिक्रिया -

स्वॅब न देताच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा अजब प्रकार शुक्रवारी समोर आला होता. यावेळी ज्याचा हा स्वॅब होता त्या महिलेला आपण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे आरोग्य अधिकारी रवींद्र पुरी यांनी ईटीव्ही भारतला सांगितले होते. मात्र आज (शनिवार) रवींद्र पुरी यांनी आपल्या विधानात घुमजाव केले असून आपण प्राथमिक माहितीनुसार ती प्रतिक्रिया दिली होती. हा स्वॅब कोणाचा होता याची चौकशी सुरू असल्याची दुसरी प्रतिक्रिया त्यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.

मोताळ्यात पॉझिटिव्ह आलेला तो स्वॅब कोणाचा
काय आहे प्रकार -
मोताळ्यातील पंडितराव देशमुख यांना खोकला असल्यामुळे ते 25 फेब्रुवारी रोजी मोताळ्यातील सहकार विद्या मंदिर कोरोना केंद्रामध्ये स्वॅब तपासणीसाठी गेले होते. याठिकाणी त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांकाची नोंद घेण्यात आली. मात्र, त्यांना स्वॅबसाठी दुपारी बोलविण्यात आले होते. नंतर पंडितराव कोरोना केंद्रात गेलेच नाही. त्यानंतर त्यांना शुक्रवारी 5 मार्च रोजी पंडितराव यांना तुम्ही पॉझिटिव्ह आल्याचे कोरोना केंद्राकडून सांगण्यात आले.
Last Updated : Mar 6, 2021, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details