बुलडाणा - समाज सुन्न करणाऱ्या चिखली येथील ९ वर्षीय चिमुकलीवर अमानुषपणे आळीपाळीने केलेल्या बलात्कार प्रकरणी जिल्हा न्यायालयाने दोन्ही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आज (गुरुवार, 7 ऑगस्ट) दिलेल्या ऐतिहासिक निकालामुळे जिल्ह्यात तब्बल ५५ वर्षानंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पॉक्सो कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील ही फाशीच्या शिक्षेची पहिलीच घटना आहे.
चिखलीतील ९ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार प्रकरणी दोन्ही नराधमांना फाशीची शिक्षा
या नराधमांना फाशीची शिक्षा दिल्याने त्या चिमुकलीला आज खरा न्याय मिळाला आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत. सागर विश्वनाथ बोरकर व निखील शिवाजी गोलाईत अशी शिक्षा झालेल्या नराधमांची नावे आहेत. तर, गुन्हेगारांना फाशीची शिक्षेचा निकाल चिखलीकरांच्या कानावर पडताच चिखलीत फटाके उडवण्यात आले.
या नराधमांना फाशीची शिक्षा दिल्याने त्या चिमुकलीला आज खरा न्याय मिळाला आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत. सागर विश्वनाथ बोरकर व निखील शिवाजी गोलाईत अशी शिक्षा झालेल्या नराधमांची नावे आहेत. तर, गुन्हेगारांना फाशीची शिक्षेचा निकाल चिखलीकरांच्या कानावर पडताच चिखलीत फटाके उडवण्यात आले.
२७ एप्रिल २०१९ रोजी चिखलीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झोपणाऱ्या गरीब परिवारातील आपल्या आईजवळ झोपलेल्या ९ वर्षीय चिमुकलीला आईच्या कुशीतून उचलून नेऊन तिच्यावर अमानुषपणे आळीपाळीने बलात्कार केला होता. विशेष म्हणजे या चिमुकलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने तिला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यावर संपूर्ण तपास करून गुन्ह्यातील दोषारोपपत्र ठाणेदार वाघ यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केले होते.
या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून होते. या गुन्ह्यातील सागर विश्वनाथ बोरकर व निखील शिवाजी गोलाईत या दोन्ही गुन्हेगारांना आज गुरुवारी १३ ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १५ साक्षीदारांच्या व चिमुकलीच्या साक्षीवरून विविध कलमान्वये दोघांना दोषी धरले असून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा निकाल गुरुवारी लागणार असल्याने चिखली पोलीस स्टेशवर दोन दिवसापासून रोषणाई करण्यात आली होती. तर, फाशीच्या निकालानंतर चिकलीत फटाके फोडण्यात आले. सरकारी पक्षातर्फे अॅड. व्ही.एल. भटकर व अॅड. सोनाली सावजी यांनी काम पाहिले.