बुलडाणा- जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील 13 नगर परिषद प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी 23 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत टाळेबंदी लावण्याचा निर्णय घेतला होता. त्याला व्यापारी संघटनेने विरोध दर्शविला असून जिल्ह्याधिकाऱ्यांनी ज्या हेतूने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आदेश पारित केले आहे. ते सफल होताना दिसत नसल्याने आज 24 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांना चिखली व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन देवून दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व प्रतिष्ठाने उघडी ठेवून त्यानंतर जिल्ह्यात कडक कर्फ्यु लावण्याची मागणी केली आहे.
बुलडाण्यात टाळेबंदीच्या आदेशाला व्यापारी संघटनेचा विरोध
टाळेबंदीच्या निर्णयाला व्यापारी संघटनेने विरोध दर्शविला असून जिल्ह्याधिकाऱ्यांनी ज्या हेतूने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आदेश पारित केले आहे. ते सफल होताना दिसत नसल्याने आज 24 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांना चिखली व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन देवून दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व प्रतिष्ठाने उघडी ठेवून त्यानंतर जिल्ह्यात कडक कर्फ्यु लावण्याची मागणी केली आहे.
व्यवसायाचे नुकसान होत असल्याचे मत
डिपीरस्ता व्यापारी असोसिएशन, चिखली यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवदेनात नमूद आहे की, दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील 13 ही तालुक्यात प्रतिबंधीत क्षेत्रे घोषित केली आहेत. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांना सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. मात्र, टाळेबंदीमध्ये देखील नागरिक मुक्तपणे फिरत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होत असताना दिसत नाही. तर अनेक व्यापारी व व्यावसायिकांनी बँकेकडून कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे आम्हाला देखील व्यवसाय करण्यासाठी दुपारी 12 वाजेपर्यंत वेळ निश्चित ठरवून देण्यात यावे, त्यानंतर कडक संचारबंदी लावून रस्त्यावरील नागरिकांचा मुक्त संचार थांबवावा. जेणे करून कोरोना महामारीची साखळी तोडण्यास मदत होईल. आपण काढलेल्या आदेशामुळे कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना डिपीरोड व्यापारी असोसिएशन चिखलीचे अध्यक्ष राकेश चोपडा, सचिव श्यामसुंदर खरपात,सदस्य प्रवीण भालेराव,उदय करवा, संगिता राजपूत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.