महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेच्या हस्ते ध्वजारोहण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार शनिवारी 1 मे महाराष्ट्र दिनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 वाजता साधेपणाने ध्वजारोहण पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी एस.राममुर्ती, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आणि जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया तसेच कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थीत होते.

The Guardian Minister Dr. Flag hoisting by hand, at Buldana
बुलडाण्यात पालकमंत्री डॉ. शिंगणेच्या हस्ते ध्वजारोहण

By

Published : May 2, 2021, 9:29 AM IST

बुलडाणा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार शनिवारी 1 मे महाराष्ट्र दिनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 वाजता साधेपणाने ध्वजारोहण पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी एस.राममुर्ती, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आणि जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया तसेच कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थीत होते.

The Guardian Minister Dr. Flag hoisting by hand, at Buldana

केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातच ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापनेला शनिवारी 1 मे रोजी 61 वर्ष पुर्ण झाले. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याचे शासनाकडून दिशानिर्देश देण्यात आले होते. याबाबत शासनाने परिपत्रकही जारी केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 वाजता पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त यावर्षी फक्त जिल्हाधिकारी कार्यालयातच ध्वजारोहण करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details