बुलडाणा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या सावळा येथील शेतातील सोयाबीन सुड्यांना आग लागली होती. या आगीत त्यांचे ३ लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले. ही आग राजकीय वैमनस्यातून लावली असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे. ज्यांना समोरासमोर लढायची हिम्मत नसते, अशांनीच आग लावण्याचे काम केले आहे, असा कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला, तरी माझा आवाज दाबता येणार नाही, अशी प्रतिक्रिया तुपकर यांनी दिली आहे.
राजकीय वैमनस्यातूनच माझ्या शेतातील सोयाबीनला लावली आग - रविकांत तुपकर
माझ्या शेतातील सोयाबीनला लागलेली आग ही राजकीय वैमनस्यातून लावण्यात आली असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.
माझ्या शेतातील सोयाबीनची आग ही राजकीय वैमनस्यातून: रविकांत तुपकर
रविकांत तुपकर हे आक्रमक भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या भाषणातून ते विरोधकांना आडव्या हाताने घेतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांची भाषणे प्रचंड गाजली होती. त्यातून दुखावलेल्या कुण्या नेत्याने तर हे अग्निकांड घडविले नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.