महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 8, 2020, 1:02 PM IST

ETV Bharat / state

'भाजपवाल्यांनी अगोदर आपले नागरिकत्व सिद्ध करावे'

ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा भ्रमनिरास करणाऱ्या सरकारच्या विरोधात राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शुक्रवारी बुलडाण्याच्या जळगाव जामोद याठिकाणी उपविभागीय कार्यालयावर क्रांती मोर्चा काढण्यात आला.

Raju Shetty
राजू शेट्टी

बुलडाणा- राज्यातील अंगणवाडी सेविकांना 6 लाख मोबाईल देणे, म्हणजे अंबानीच्या मोबाईलची विक्री करण्याचा भाजपचा फंडा आहे. सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नावरील लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) हे मुद्दे भाजपने समोर आणले, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. तसेच अगोदर भाजपवाल्यांनी आपले नागरिकत्व सिद्ध करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष

हेही वाचा - 'कर्जमाफीचा लाभ गावातील ५ लोकांनाही नाही, द्यायचं नाही तर फसवता का?'

शेट्टी बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील आयोजित क्रांती मोर्चाचे नेतृत्व करताना बोलत होते. जामोद येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह सीएए आणि एनआरसी रद्द करण्यासाठी क्रांती मोर्चा काढण्यात आला. सरसकट कर्जमाफी करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, पीकविमा 100 टक्के मंजूर करून बँक खात्यात जमा करण्यात यावी या मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शेट्टी म्हणाले, संपूर्ण जग महात्मा गांधींना मानते. मात्र, गांधींची हत्त्या करणाऱ्याला व्यक्तीस मान देणाऱ्या भाजपला लाज वाटली पाहिजे. भाजपला स्वातंत्र्य लढ्याचा अजिबात इतिहास नाही अन् ते आम्हाला इतिहास सांगायला निघाले, असा टोला यावेळी शेट्टींनी लगावला.

हेही वाचा - जामोदमध्ये आई-वडिलांनीच डोक्यात कुदळीने वार करून केली पोटच्या मुलाची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details