महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंसमोर प्रतापरावांचा मतदारांना साष्टांग दंडवत

महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी १२ एप्रिलला खांमगाव येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते

By

Published : Apr 13, 2019, 5:48 PM IST

उद्धव ठाकरेंसमोर प्रतापरावांचा मतदारांना साष्टांग दंडवत

बुलडाणा - महायुतीचे बुलडाणा लोकसभेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समक्ष मतदारांना साष्टांग दंडवत घातला. जाधव यांच्या, अशा कृतीने सर्वांच्याच भुवया उचवल्या होत्या.

महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी १२ एप्रिलला खांमगाव येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते, राज्याचे मंत्री महादेव जानकर, गुलाबराव पाटील, रणजित पाटील, संजय राठोड, गोपिकीशन बाजुरीया, श्रीकांत देशपांडे उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंसमोर प्रतापरावांचा मतदारांना साष्टांग दंडवत

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मंचावर आल्यानंतर युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी प्रथम आपले मनोगत व्यक्त केले. तसेच आपल्या धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करत उद्धव ठाकरेंसमक्ष मंचावरून मतदारांना साष्टांग दंडवत घातला.

ABOUT THE AUTHOR

...view details