बुलडाणा - यापूर्वी चिखलीत अनेकदा साठवून ठेवलेल्या प्रतिबंधित गुटख्यावर कारवाया केल्या आहेत. पुन्हा चिखली येथील माळिपुरा परिसरातील घरात साठवून ठेवलेला तीन लाखाचा प्रतिबंधित गुटखा शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी चिखली पोलिसांनी जप्त केला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून घरमालक यासीन खाँ अब्दुला खाँ याला अटक केला आहे. तर मुख्य आरोपी गुटखा मालक फरार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे हे असूनही चिखलीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा येतोच कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चिखलीतील वार्ड नंबर ९, माळीपुरा भागातील रहिवाशी असलेले यासीन खाँ अब्दुला खाँ याच्या राहत्या घरात प्रतिबंधित गुटखा असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकला होता. घरात प्रतिबंधित गुटख्याचे जवळपास तीन लाखाचे सात पोते साठवून आल्याने समोर आलं. यावरून चिखली पोलिसांनी घरमालक यासीन खाँ अब्दुला खाँ याला ताब्यात घेऊन विश्वासाने विचारले असता हा माल शेख रईस शेख अफसर यांच्या मालकीचा असल्याची माहिती दिली. यावरून पोलिसांनी यासीन खाँ अब्दुला खाँ व शेख रईस शेख अफसर या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
चिखलीत पुन्हा तीन लाखाचा गुटखा पोलिसांनी केला जप्त
चिखलीतील वार्ड नंबर ९, माळीपुरा भागातील रहिवाशी असलेले यासीन खाँ अब्दुला खाँ याच्या राहत्या घरात प्रतिबंधित गुटखा असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकला होता. घरात प्रतिबंधित गुटख्याचे जवळपास तीन लाखाचे सात पोते साठवून आल्याने समोर आलं.
अटक आरोपीसह पोलीस पथक
या कारवाईत ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग शिंदे, पोलीस हवालदार शशिकांत धारकरी, नाईक सुनील सोनुने, गोरखनाथ राठोड यांनी सहभाग नोंदविला.