बुलडाणा - संग्रामपूर तालुक्यातील बावनबिर येथील टुनकी मेन रोड वरील ईदगाव परिसरात रमजान ईद निमित्त गावातील समस्त मुस्लिम बांधव नमाज पठण करत होते. यावेळी परिसरातील एका भागात अचानक दोन गटात मारहाण झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर इतर जखमी झाले आहे. या घटनेमध्ये पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती शांत केली.
बुलडाण्यात बावनबीर परिसरात चाकूहल्ला, एकाचा मृत्यू
एका कार्यक्रमानंतर दोन गटात एकदम शिवीगाळ आणि मारामारी सुरू झाली. यावेळी एकमेकांवर चाकूने वार करण्यात आले. हा प्रकार नेमका काय सुरू आहे हे कळण्याच्या आतच एक युवक गंभीर जखमी झाला. शेख रफिक शेख गणी (वय 27 वर्ष) या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.
चाकूने वार -एका कार्यक्रमानंतर दोन गटात एकदम शिवीगाळ आणि मारामारी सुरू झाली. यावेळी एकमेकांवर चाकूने वार करण्यात आले. हा प्रकार नेमका काय सुरू आहे हे कळण्याच्या आतच एक युवक गंभीर जखमी झाला. शेख रफिक शेख गणी (वय 27 वर्ष) या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.
पाच जण पोलिसांच्या ताब्यात -दरम्यान या घटनेची माहिती सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. हाणामारी करणाऱ्यांना ताब्यात घेत सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. यावेळी येथील प्रतिष्ठित नागरीकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. थोड्यावेळाने परिस्थिती शांत झाली. त्यानंतर या घटनेतील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीधर गुट्टे करीत आहे. दरम्यान, घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या पोलिसांचा गावात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.