महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Suicide News : अल्पवयीन आदिवासी प्रेमी युगुलाची आत्महत्या; सुनगाव शिवारातील घटना

बुलडाणा जिल्ह्यातील सुनगाव शिवारात आज (रविवारी) एका अल्पवयीन प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अज्ञात असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

By

Published : Apr 16, 2023, 8:17 PM IST

Minor Tribal Couple Suicide Buldana
आत्महत्या

बुलडाणा: पोलीस सुत्रांनुसार, जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या आदिवासी गाव असलेल्या कहू पट्टा येथील अल्पवयीन प्रेमीयुगलाने आज मृत्यूला कवटाळले. राजेश (नाव बदललेले, वय 16 वर्षे) आणि रेणुका (नाव बदललेले, वय 16 वर्षे) अशी दोघा मृतकांची नावे आहेत. दोघांनी थानसिंग मोरे यांच्या शेतात आत्महत्या केली.

पोलीस पाटलांची घटनास्थळी धाव:प्रेमी युगुलाच्या आत्महत्येची बातमी कळताच गहू पट्ट्यातील आदिवासी नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत नागरिकांनी सुनगावचे पोलीस पाटील तडवी यांना माहिती दिली. यानंंतर पोलीस पाटील तडवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याला घटनेविषयी माहिती दिली. यानंतर जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे एपीआय कैलास चौधरी, पीएसआय शिवानंद वीर, बीड जमदार शेगोकार पोलीस कॉन्स्टेबल वावगे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि प्रेमीयुगलाचे मृतदेह खाली उतरून पंचनामा करण्यात आला.

आत्महत्येचे कारण अज्ञात: घटनेची तक्रार मृतक आकाश याचे काका सखाराम डावर यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्याला दिली. प्रेमीयुगलाने आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही कळलेले नाही. घटनेचा तपास ठाणेदार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे पथक करीत आहेत.

'सोबत जग अथवा सोबत मरू': प्रेमी युगुलाने यापूर्वीही आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना हिंगोली जिल्ह्यात घडली होती. 'सोबत जग अथवा सोबत मरू' अशा प्रेमाच्या शपथा घेतलेल्या दोन प्रेमी युगलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औंढा नागनाथ तालुक्यात 10 मे, 2020 रोजी घडली होती. दोघांच्याही लग्नाला घरातून विरोध होता. शेवटी या दोघांनीही सोबत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

दोघेही भावकीतील असल्याने लग्न अशक्य: दोघेही भावकीतील होते. त्यामुळे दोघांचेही सोबतच कामासाठी येणे जाणे होत. दरम्यान, ते एकमेकांच्या प्रेमात पडले, अशा प्रकारच्या चर्चा गावात होत्या. मात्र, दोघे एकाच भावकीतील असल्यामुळे त्यांच्या लग्नाला दोन्ही घरच्यांनी कडाडून विरोध केला. भावकीतीलच असल्याने नेमके लग्न लावून द्यायचे कसे ? हा प्रश्न दोन्ही कुटुंबीयांसमोर होता. त्यामुळे त्यांनी या दोघांची अनेकदा समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघांवर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. काल (शनिवार) रात्रीपासूनच हे दोघे गावातून बेपत्ता झाले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. त्यानंतर आज पहाटे, गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर जंगलात दोघांचे मृतदेह आढळले. घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंजित भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

हेही वाचा:Atiq Ashraf Wife : अतिकची पत्नी शाइस्ता परवीन, अशरफची पत्नी जैनब करू शकतात सरेंडर; पोलीस अलर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details