बुलडाणा - तीन वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याचा प्रकार शुक्रवारी (24 जुलै) नांदुरा पंचायत समितीच्या मागील भागात घडला. ही बाब समोर आल्यानंतर संबंधित नराधमास नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
बुलडाण्यात तीन वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; नराधम गजाआड
तीन वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याचा प्रकार शुक्रवारी (24 जुलै) नांदुरा पंचायत समितीच्या मागील भागात घडला. ही बाब समोर आल्यानंतर संबंधित नराधमास नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
बुलडाण्यात तीन वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; नराधम गजाआड
पीडित बालिकेला नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खामगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच आरोपीवर खूनाचा प्रयत्न, बलात्कार व पोक्सो कायद्यानुसार नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.