बुलडाणा -लोकसभा निवडणूक २०१९ च्या दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभा मतदारसंघात एकूण ६३.६३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. ही टक्केवारी २०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या तुलनेत २.१८ टक्क्यांनी वाढली आहे. २०१४ मध्ये बुलडाणा लोकसभा मतदार संघामध्ये ६१.३५ टक्के मतदान झाले होते. निवडणुकीत वापरलेले ईव्हीएम मशीन व्हीव्हीपॅटसह बुलडाण्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पाठविण्यात आले आहेत.
निवडणुकीत वापरलेले ईव्हीएम मशीन व्हीव्हीपॅटसह बुलडाण्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्ट्राँग रुममध्ये आणण्यात आले. या रुमला चारी बाजुंनी सुरक्षेचा कडा पहारा आहे. तर संपूर्ण इमारत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताब्यात आहे. सीआरपीएफचे जवान रुमची सुरक्षा करत आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी रुमवर देखरेख ठेवण्यात येत आहे.