महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून तो हिंदू असूनही धरतो मुस्लीम धर्माचे रमजानचे 'रोजे

सध्या मुस्लीम धर्माचा पवित्र रमजान महिना सुरू आहे, या महिन्यात मुस्लीम लोक आपल्या ईश्वरला (अल्लाहाला) मनवण्याकरिता रोजे धरतात. सकाळी ४ वाजून २० मिनीटापर्यंत जेवण करतात आणि त्यानंतर संध्याकाळी ७ वाजून ५ मिनिटांपर्यत काहीच खात-पित नाहीत, असे हे महिनाभर करतात.

By

Published : Jun 3, 2019, 7:57 PM IST

Updated : Jun 3, 2019, 8:32 PM IST

हिंदू असूनही धरतो मुस्लीम धर्माचे रमजानचे 'रोजे

बुलडाणा - दुसऱ्यांच्या धर्मांचा आदर केला तर तेही आपल्या धर्मांचा आदर करतील, हा संदेश देत बुलडाण्यातील एक हिंदू धर्मीय अधिकारी मुस्लीम धर्माचे पवित्र रमजानचे पूर्ण रोजे धरत आहे. या अधिकऱ्याने समाजात सर्वधर्म समभावतेचा संदेश दिला आहे. बुलडाण्यातील उपवनसंरक्षक संजय माळी, असे या अवलिया अधिकाऱ्याचे नाव आहे.

हिंदू असूनही धरतो मुस्लीम धर्माचे रमजानचे 'रोजे

भारत देश विविध जातींचा, प्रांताचा देश असून या देशात एकमेकांच्या धर्मांचा आदर करून सर्वजण गुणगोविंदाने राहतात. मात्र, काही प्रमाणात गोरक्षकांकडून होणाऱ्या अशोभनीय घटनेमुळे सर्वधर्म समभावतेच्या भावनेला धक्का लागत आहे. तर दुसरीकडे सर्वधर्म समभावतेचा संदेश देत दुसऱ्यांच्या धर्मांचा आदर केला तर तेही आपल्या धर्मांचा आदर करतील ही भावना दुसऱ्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी बुलडाणा उपवनसंरक्षक असलेले संजय माळी या हिंदू अधिकाऱ्याने पवित्र रमजानचे संपूर्ण रोजे (उपवास) ठेवून सगळ्यांना समानतेचा संदेश देत आहे. सध्या मुस्लीम धर्माचा पवित्र रमजान महिना सुरू आहे, या महिन्यात मुस्लीम लोक आपल्या ईश्वरला (अल्लाहाला) मनवण्याकरिता रोजे धरतात. सकाळी ४ वाजून २० मिनीटापर्यंत जेवण करतात आणि त्यानंतर संध्याकाळी ७ वाजून ५ मिनिटांपर्यत काहीच खात-पित नाहीत, असे हे महिनाभर करतात.

बुलडाणा उपवनसंरक्षक संजय माळी यांच्या वाहनावर जफर नावाचा मुस्लीम चालक आहे. त्या चालकाला संजय माळी यांनी रोजे (उपवास) ठेवला का? असे विचारले त्यावर माझी तब्बेत ठीक नसून रोजे करण्यासंबंधी माझे शरीर साथ देत नाही असे उत्तर त्या चालकाने दिले, त्यावरून माळींनी मी तुझ्या बदल्यात रोजे ठेऊ शकतो का? असे विचारले, तेव्हा त्या चालकाने चालते असे उत्तर दिले. त्यानंतर उपवनसंरक्षक संजय माळींनी दुसऱ्या दिवसापासून (७ मे) रोजे धरण्यास सुरुवात केली, आज ३ जूनच्या सोमवारी ही २८ व्या दिवशीही त्यांनी २८ वा रोजा धरलेले आहे. हे रोजे धरत त्यांना हलके वाटत असून मनात शांतता निर्मात होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली, आपण दुसऱ्यांच्या धर्मांचा आपण आदर केला तर आपल्याही धर्मांचा आदर दुसऱ्यांकडून होऊ शकतो. सर्व सर्व-धर्म समभवात जगू शकतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे त्यांना सर्व-धर्म समभावतेचा अवलिया या नावाने ओळखले जात आहे.

Last Updated : Jun 3, 2019, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details