महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संतापजनक! आर्थिक नुकसानातून चार वर्षीय चिमुकल्याला दिले इलेक्ट्रिक हिटरचे चटके

कुणाच्याही अंगाचा थरकाप उडील अशी घटना बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथून समोर आली आहे. वडिलांशी झालेल्या व्यवहारात नुकसान झाल्याचा राग धरून माथेफिरूने व्यवहार झालेल्याच्या चिमुकल्याला घरात बोलावून इलेक्ट्रिक हिटरचे चटके दिले. चटक्यांमुळे त्याच्या सर्वांगावर जखमा झाल्या असून, चिमुकला 30 टक्के भाजला आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.

चार वर्षीय चिमुकल्याला दिले इलेक्ट्रिक हिटरचे चटके
चार वर्षीय चिमुकल्याला दिले इलेक्ट्रिक हिटरचे चटके

By

Published : Sep 5, 2020, 8:07 PM IST

बुलडाणा - कुणाच्याही अंगाचा थरकाप उडेल, अशी घटना बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथून समोर आली आहे. वडिलांशी झालेल्या व्यवहारात नुकसान झाल्याचा राग मनात धरून माथेफिरूने व्यवहार झालेल्याच्या चिमुकल्याला घरात बोलावून इलेक्ट्रिक हिटरचे चटके दिले. या प्रकरणी चिमुकल्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी आज शनिवारी 5 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.


शेगाव येथील भोईपुरा सुरेश चिंचोलकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शेगाव येथील आरोपी महादेव सीताराम लांबे याची जागा त्याच्याकडून कायदेशीररीत्या खरेदी केली. मात्र, पैसे कमी दिल्याचा राग लांबे याच्या मनात होता.

दरम्यान 1 सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास चिंचोलकर यांचा 4 वर्षीय मुलगा दर्शन लांबेच्या घरासमोर खेळत असताना त्याने दर्शनला घरी बोलावले. त्याच्या छाती, मांडीसह पाठीवर इलेक्ट्रिक हिटरचे चटके देऊन गंभीररित्या जखमी करून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, चिमुकल्याची आई घटनास्थळी मुलास सोडवण्यास गेली असता, लांबे याने तिलाही इलेक्ट्रिक हिटरचे चटके दिले. यावेळी चिंचोलकार यांनी आपल्या चिमुकला दर्शनला जखमी अवस्थेत उपचारासाठी अकोला येथे दाखल केले. या प्रकरणात दर्शन 30 टक्के भाजल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी आज शनिवारी 5 सप्टेंबर रोजी सुरेश चिंचोलकार यांनी शेगांव शहर पोलिसांत लांबेविरुद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी कलम 307 नुसार गुन्हा दाखल करून आरोपी महादेव सीताराम लांबे याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक टाले अधिक तपास करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details