महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

toor burnt : शेतकऱ्याच्या तुरीच्या गंजीला आग; आगीत अडीच लाखांचे नुकसान

बुलढाण्यातील चोरपांगरा येथे तुरीच्या गंजीला आग लागल्याने ( field caught in fire in buldhana ) शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. आगीत अडीच लाखांचे तुरीचे पिक नुकसान झाले ( Farmer loss two and half lakh ) आहे. या परिसरात वेळोवेळी असे अनेक प्रकार घडत आहेत.

toor burnt
v

By

Published : Jan 6, 2023, 6:19 PM IST

तुरीच्या गंजीला आग

बुलढाणा :बीबी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चोरपांग्रा येथील शेतकरी विठोबा तुकाराम जायभाये यांच्या शेतामध्ये तुरीच्या गंजीला ( field caught in fire in buldhana ) अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळेला जाळून टाकले आहे. अडीच एकरातील तुरीचे अंदाजे किंमत दोन लाख 25 हजार रूपये नुकसान झाले आहे. या परिसरात वेळोवेळी असे अनेक प्रकार घडत आहेत. लोणार तालुक्यातील चोरपांग्रा येथील शेतकऱ्यांच्या तुरीच्या गंजीला आग लावून 2 लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना उघडकीस आली ( Farmer loss two and half lakh ) आहे.


तुरीच्या पिकाच्या सुडीला आग : चोरपांगरा येथील शेतकरी विठोबा जायभाये ( Vithoba Jaibhaye toor burnt ) यांची गट नंबर 58 मध्ये 110 आर शेती आहे. त्यांनी शेतामध्ये तुरीच्या पिकाची सोंगणी करून गंज लावून ठेवली होती. त्यांच्या शेतातील तुरीच्या पिकाच्या सुडीमधून धूर निघत असल्याची माहिती त्यांना शेजाऱ्याने दिली. त्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता तुरीची सुडी जळाल्याचे दिसून आले. शेतकरी विठोबा जायभाये यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावून 27 क्विंटल तुर किंमत 2 लाख 25 हजार रुपयांचे नुकसान केली आहे.

आग लावण्याचे प्रकार :ग्रामीण भागात शेतमालाच्या गंजीला आग लावण्याचे प्रकार घडत आहेत. बीबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरपांगरा येथे काल रात्री अडीच एकरातील तुरीची गंजी जाळून टाकल्याची घटना समोर आली. त्यामुळे शेतकरी विठोबा तुकाराम जायभाये यांचे अंदाजीत २ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतमाल जळण्याच्या घटना वाढत आहेत. शेतमाल जाळून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यात येत आहे.आधीच अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

लाखो रुपयांची झळ शेतकऱ्यांना : बिकट परिस्थितीत शेतकरी पीक उत्पादन घेण्यासाठी जीवाचे रान करतो आहे. शेतात कापणीनंतर साठवून ठेवलेल्या शेतमालाच्या गंजीला आग लावली जात आहे. अज्ञातांकडून घडणाऱ्या या प्रकारामुळे लाखो रुपयांची झळ शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकरी विठोबा तुकाराम जायभाये त्यांच्या अडीच एकरातील तुरीच्या गंजीला अज्ञात इसमाने पेटवून दिले. दरम्यान तुर जळाल्याने अंदाजीत २ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी पुत्र योगेश जायभाये म्हणाले आहेत. शिवाय बीबी पोलीस ठाणे हद्दीत अशा घटना घडल्या असून, कारवाई केल्या जात नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. सदर प्रकरणी नवनियुक्त ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांनी अज्ञात आरोपीचा शोध घेऊन न्याय मिळवून द्यावा, अन्यथा पोलीस ठाण्यावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढू, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details