बुलढाणा : मृतक काशिराम मंझा यांच्या मुलीच्या लग्नाची जोरदार तयारी चालू होती. लग्न ऐन 2 दिवसावर म्हणजे 27 एप्रिलला आहे. काशीराम मंझा मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून आपल्या दुचाकी वाहनाने परत येत असताना मुर्ती फाटा दरम्यान बुलढाण्याकडे जाणाऱ्या ट्रक आणि मंझा यांच्या दुचाकीची भिषण धडक झाली. त्यांना बुलढाणा - मलकापूर रोडवरील पेपर मिल जवळील वळणावर सायंकाळी ट्रकने धडक दिली. यामध्ये काशीराम मंझा यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात दुख:चे वातावरण झाले. तसेच या भयंकर अपघातामुळे घरच्यांना आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला.
Buldana Accident : मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटताना वडील अपघातात ठार, नातेवाईकांना बसला धक्का
तालुक्यातील मोताळा कुरहा गोतमारा येथील काशीराम मंझा हे आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून घरी परत येत असतांना त्यांना बुलढाणा -मलकापूर रोडवरील पेपर मिल जवळील वळणावर सायंकाळी ट्रकने धडक दिली. यामध्ये काशिराम मंझा हे जागीच ठार झाले.
भरधाव जाणाऱ्या ट्रकने धडक दिली : तालुक्यातील कुरा गोतमारा येथील काशीराम मंझा यांच्या मुलीचा दोन दिवसांनी विवाह होणार आहे. त्यामुळे काशीराम मंझा यांची लग्नाच्या पत्रिका वाटण्याचा लगबग सुरू होती. काशीराम मंझा हे मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी त्यांच्या MH-28 AG 691 क्रमांकाच्या दुचाकीने खैरखेड येथे गेले होते. पत्रिका वाटल्यावर परत येत असताना मूर्ती फाट्याजवळील वळणावर त्यांच्या दुचाकीला मलकापूर कडून बुलढाणाकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने (ट्रक क्रमांक MH 30 AL 2465) धडक दिली.
डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले : या धडकेत दुचाकी वरील काशीराम मंझा त्यांच्या दुचाकीसह ट्रकच्या चाकाखाली आले. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांनी त्यांना रुग्णवाहिकेतून बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मंझा यांच्या अपघाती निधनामुळे कुरा गोतमारा गावावर शोककळा पसरली आहे.. यावेळी बोराखळी पोलीस स्टेशनचे एपीआय विलास पाटील नंदकिशोर धांडे दीपक पवार आणि मंगेश पवार यांनी अपघात ग्रस्त यांना रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत. या भयंकर अपघातामुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे.
हेही वाचा :Income Tax Raid Nashik: नाशिकमध्ये सातहून अधिक बांधकाम व्यवसायिकांवर आयकर विभागाची छापेमारी; 3 हजार 333 कोटींचा बेहिशेबी व्यवहार उघड