बुलडाणा - नेहमीच कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत राहणाऱ्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आता एका नवीन वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. त्यांनी हिंदू बांधवांना प्रोटीनयुक्त आहार घेण्याचे आवाहन केले. दररोज ३ ते ४ अंडी आणि एक दिवसा आड चिकन, मटन खाण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यांच्या वक्तव्यामुळे आता वारकरी आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात येत असून वारकरी आणि आमदार संजय गायकवाड यांच्यात झालेल्या वार्तालापाचा ऑडिओ व्हायरल होत आहे.
आमदार संजय गायकवाड यांचे विविध व्यक्तींबोरबरचे संभाष, त्याचबरोबर अकोल्यातील विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांची प्रतिक्रिया हेही वाचा -शेगावहून ऑक्सिजन एक्स्प्रेसची दुसरी खेप पश्चिम महाराष्ट्रासाठी रवाना
मासांहारीबाबत आमदार संजय गायकवाड यांनी केले हे आवाहन
संपूर्ण देशामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यांच्यामुळे पडणारे मृत्यूचे बळी जणू काही मृत्यूचा तांडव संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये पाहायला मिळत आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून बुलडाणा शहरामध्ये अंतिम संस्काराचा सर्व खर्च हा माझ्या पुढाकाराने मोफतमध्ये केल्या जात असल्यामुळे रोजचे पंचवीस-सव्वीस मृतदेह एकाच स्मशानभूमीत जाळताना पाहत आहे. अतिशय जिवाभावाचे, जवळचे लोक आज भेटले आणि उद्या गेला, दुपारी बोलतो आणि संध्याकाळी जातो, हे चित्र माझ्या डोळ्यासमोर पाहिले आणि त्यातून एकच मला दिसते, शरीरातील इम्युनिटी पावर, शहरातील असलेले प्रोटीनचे प्रमाण. आणि म्हणून मी काल, पर्वाला सांगितले की, शक्य असेल तर दररोज दोन, तीन अंडी खाल्ली पाहिजेत किंवा चिकन, मटन खाल्ले पाहिजे, याने प्रतिकारशक्ती वाढते. हे बोलण्याचा करण असे, की मी मुस्लीम समाजात पाहत आहे की, रोजा (उपवास) असतााना देखील सकाळी सूर्योदय पूर्वी आणि सूर्योदय नंतर नॉनव्हेज खाल्यानंतर आज त्या समाजामध्ये मृत्यूचे प्रमाण अतिशय अल्प प्रमाणामध्ये आहे. त्यांच्यामध्ये नॉनव्हेजमुळे त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती आली, इम्युनिटी पावर त्यांच्यामध्ये आली. आणि त्यामुळे माझ्या समर्थकांना, माझ्या चाहत्यांना आवहन केले की, आपण देखिल आपला जीव वाचवण्याकरिता उपास-तपास बाजूला ठेवून हे सगळे लोकांनी खाल्ले पाहिजे. कारण उपास-तापासामध्ये माणसाची इम्युनिटी पावर कमी होतो. प्रतिकारशक्ती कमी होते. आणि ती वाढावी याच्याकरिता मी हे आवहन केलेले होते, असे गायकवाड म्हणाले.
देव आज कुलुपात बंद आहे. देवाच्या रुपाने डॉक्टर आमच्या समोर उभा आहे. नर्स आमच्यासमोर उभी आहे. पोलीस उभे आहे. कर्मचारी उभे आहेत. संपूर्ण यंत्रणा उभी आहे. आज खरोखर देवाचा चमत्कार असता तर इतका मृत्यूचा तांडव या ठिकाणी झाला नसता. आणि म्हणून लोकांनी नॉनव्हेज खाऊन स्वतःला वाचवावे, असे आवाहन बुलडाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी एका वृत्तपत्रातून केले.
आमदार गायकवाड यांनी वारकरी व हिंदू धर्मियांची जाहीर माफी मागावी, अन्यथा..
कोरोनाच्या नावाने हिंदू सनातन धर्मीयांना मासाहाराकडे वळवण्याचा बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या आवाहनामुळे पूर्ण महाराष्ट्रात वारकऱ्यांच्या आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्यासोबत विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी फोनवर चर्चा केली असता संजय गायकवाड यांनी म्हटले की, मुस्लीम समाजामध्ये मांसाहाराचे प्रमाण जास्त आहे आणि म्हणून मुस्लीम समाजात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे आणि हिंदू धर्मीयांमध्ये मासाहाराचे प्रमाण कमी आहे म्हणून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यांना या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला सांगितली तर ते आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले. त्यांना आम्ही म्हटले आपले बोलणे योग्य नाही यामुळे वारकऱ्यांच्या, हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या. तर संजय गायकवाड म्हणतात, मला कुणाच्या भावनांचे घेणे देणे नाही, मला लोकांचे प्राण वाचवायचे आहेत, तुम्हाला कोणाला मानायचे असेल तर माना, पण मी कोणाला मानत नाही, असेही ते म्हणाले. आमदार संजय गायकवाड यांच्या बोलण्याचा सरळ अर्थ हा निघतो युगा युगाचा शाकाहारी असणारा हिंदू सनातन धर्म मासाहाराच्याकडे वळावा. कोरोनामुळे तुमचा जीववाचवण्याची भीती दाखवून आमदार संजय गायकवाड हे मासाहाराकडे वळवण्याचा गोंडस प्रयत्न करत आहेत. पण, त्यांचा प्रयत्न वारकरी हाणून पडल्याशिवाय राहणार नाही. सदर केलेल्या वक्तव्याबद्दल आमदार गायकवाड यांनी जाहीर माफी मागावी, याकरिता आमदाराशी फोनवर चर्चा केली असता ते म्हणतात मी माफी मागणार नाही चर्चा करायला तयार आहो. तुम्ही म्हणाल तिथे मी येतो किंवा तुम्ही माझ्याकडे या. मात्र, आमदार संजय गायकवाड यांनी हिंदू धर्मीयांनी माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रभर वारकरी सांप्रदायाकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अकोला येथील विश्व वारकरी सेनेचे संस्थपाक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी दिला.
दुसरीकडे संग्रामपूर येथील गजानन महाराज दहीकर यांनी सुद्धा आमदार गायकवाड यांच्या या वक्तव्याबद्दल मोबाईलद्वारे विचारणा केली असता त्यांना सुद्धा गायकवाड यांनी अश्लील भाषेत संभाषण करून तुम्हाला काय करायचे ते करा. असे म्हणत तुम्ही जेथे म्हणाल तेथे आपण भेटू आणि समोरा-समोर चर्चा करू, असे उद्धटपणे सांगितल्याचे ऑडियो क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संजय गायकवाड आपल्या वक्तव्यावर ठाम
मी माझ्या समर्थकांना, माझ्या चाहत्यांना जे कोरोनाशी झुंज देत आहेत त्यांचा जीव वाचावा म्हणून त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता प्रोटीन म्हणजे, किमान अंडी आणि चिकन मटण खावे असे आवाहन केले. त्यानंतर काही लोकांनी ते आवाहन स्वतःच्या अंगावर घेऊन माझ्यावर टीकाटिप्पणी सुरू केली आहे. मला हे सांगायचे आहे की, आज शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मधल्यासुट्टीमध्ये अंडे खायला दिले जातात. वसतिगृहात एक-दोन दिवसा आड मुलांना मटन, चिकन शासनाच्या सक्तीने दिले जातात. जी आमची सेना आहे त्यांना देखील दोन वेळा नॉनव्हेज दिल्या जात आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये शत्रूंशी लढण्याची ताकद यायला हवी. आणि म्हणून सैनिकांमध्ये कोरोनाच प्रमाण नसल्यासारखे आहे. मी जे बोललो की, मुस्लीम समाजामध्ये कोरोनाने मृत्यूचे प्रमाण नसल्यासारखा आहे, कारण त्यांचे जेवन प्रोटीनयुक्त आहे. म्हणून आपल्या लोकांनी तसे जेवन केले तर कदाचित त्यांच्यातही प्रमाण कमी होईल, याच्यामध्ये माझे चुकले कुठे? आणि माझे सांगणे तेच आहे. डॉक्टरही असाच सल्ला देतात, असा सवाल गायकवाड यांनी केला.
तसेच, असे बोलल्यामुळे हिंदू समाजाची भावना दुखावली गेली. तर, आज जे 70-80 टक्के रुटीनमध्ये नॉनव्हेज खातात त्यांचा कुठला धर्म भ्रष्ट झाला किंवा त्यांना तुम्ही कुठे धर्माच्या बाहेर हाकलले? की त्यांना धर्मात ठेवणार नाही आहे. तो अधिकार आहे आपल्याला, अशा पद्धतीने आपल्या अंगावर ओढण्याचा जो काही प्रयत्न सुरू केला आहे हा एका विशिष्ट पक्षाशी संबंधित असलेल्या सेलच्या लोकांनी सुरू केलेला आहे. माझे कुठल्याही संप्रदायावर, कुठाल्याही धर्मावर, कुठल्याही पंथावर विधान नाही. मी जे लोक मारताना पाहत आहे त्यामुळे जीव वाचवायला पाहिजे म्हणून मी एक उपाय सूचवला. हे विधान मी कुणाच्याही विरोधात केलेले नाही, म्हणून त्या विधानावर आजही मी ठाम आहे, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली. यामुळे पुन्हा आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा -लॉकडाऊन लागत असल्याने बुलडाणा शहरातील पेट्रोल पंपांसमोर वाहनधारकांची गर्दी