बुलडाणा - शहरातील गौळीपूरा भागातील दोन बालकांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला. तर, एक मुलगी बेशुद्धावस्थेत होती. सुरुवातीला मुले हरवली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र, अधीक तपासानंतर मुलांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
कारमध्ये खेळायला गेले असता कारचा दरवाजा बंद झाल्याने २ मुलांचा गुदमरून मृत्यू
मृत्यू झालेल्या दोन बालकांचे नाव अजीम (५), आहील (३) असून बेशुद्ध पडलेल्या मुलीचे नाव सेहेर (४) असे आहे. आता सेहेरची प्रकृती बरी असून तीला रूग्णालयात ठेवण्यात आले आहे.
मृत्यू झालेल्या दोन बालकांचे नाव अजीम (५), आहील (३) आणि बेशुद्ध पडलेल्या मुलीचे नाव सेहेर (४) असे आहे. आता सेहेरची प्रकृती बरी असून तीला रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. मुलगी शुद्धीवर आल्यानंतर तीने पोलिसांना नेमका काय प्रकार घडला? हे विस्तृत सांगितले आहे.
सुरुवातीला अपहरणाची शंका व्यक्त करण्यात येत होती मात्र जीव वाचलेल्या मुलीने सांगितलेल्या हकीकतीनुसार हे तिन्ही लहान मुले काल (१५ जुलै) सकाळी १० वाजता अंगणवाडीमध्ये गेले त्यांना तेथे खिचडी मिळाली. १२ वाजता ते घरी आले. ओट्यावर बसून त्यांनी खिचडी खाल्ली. आणि खेळण्यासाठी मागच्या गल्लीमध्ये गेले. तीथे एक कार होती. कारचा एक दरवाजा उघडा होता. खेळण्यासाठी मुले कारमध्ये गेली. आणि दार लॉक झाल्याने त्यांना बाहेर येता आले नाही, ज्यामध्ये दोन मुलांचा गुदमरून मृत्यू झाला तर मुलगी बचावली.