बुलडाणा- कंटेन्मेंट झोनमध्ये काम करणारे पोलीस आणि या भागातील रहिवासी यांना मंगळवारी (2 जून) जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टर व डेंटिस्ट डॉक्टर यांनी औषधे आणि टुथपेस्टचे वाटप केले.
पोलीस व नागरिकांना होमिओपॅथी औषधांचे वाटप...
पोलिसांची व कंटेंन्मेंट झोनमधील नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी होमिओपॅथी औषधे तसेच टूथपेस्टचे वाटप बुलडाण्याच्या करण्यात आले.
पोलिसांना रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याचे औषध देताना डॉक्टर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले कर्तव्य पार पाडताना डॉक्टर, नर्स, पोलीस बांधव व सफाई कर्मचारी हे सुद्धा बऱ्याच वेळेस कोरोनाला बळी पडत आहेत. तरी देखील ते आपल्या जीवाची पर्वा न करता कंटेन्मेंट झोनमध्ये कर्तव्य पार पाडत आहे. तर कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना देखील भीतीचे वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे पोलिसांची व कंटेंन्मेंट झोनमधील नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी होमिओपॅथी औषधे तसेच टूथपेस्टचे वाटप बुलडाण्याच्या करण्यात आले.