महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवमानजनक भाषा वापरल्याचा महिला कृषी अधिकाऱ्यावर आरोप; कारवाईची मागणी

शेगाव तालुक्यातील जानोरी येथील शेतकरी मुकुंद देशमुख यांनी तालुका कृषि विभागाच्या कृषी सहाय्यक ज्योती समाधान गई यांना 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला मोबाईलवरून संपर्क केला. अपमानजनक शब्द वापरून तुमची लायकी काय आहे, अशा भाषेत महिला अधिकाऱ्याने उत्तर दिले.

By

Published : Sep 5, 2020, 7:44 PM IST

Updated : Sep 5, 2020, 8:01 PM IST

कृषी विभाग
कृषी विभाग

बुलडाणा - जिल्ह्यातील शेगाव येथील महिला तालुका कृषि सहाय्यक अधिकाऱ्याने मोबाईलवर शेतकर्‍याशी बोलताना अपमानजनक भाषेचा वापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरील ऑडिओ क्लिप स्थानिक परिसरात व्हायरल झाली आहे. या ऑडियो क्लिपमधील शेतकरी मुकुंद देशमुख यांनी महिला अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शेगाव तालुक्यातील जानोरी येथील शेतकरी मुकुंद देशमुख यांनी तालुका कृषि विभागाच्या कृषी सहाय्यक ज्योती समाधान गई यांना 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला मोबाईलवरून संपर्क केला. त्यांनी शेतातील पिकाचे सर्वेक्षण कधी करण्यात येईल, याबाबत विचारणा केली. मात्र नंतर पुन्हा कॉल केल्यावर महिला अधिकाऱ्याने आक्षेपार्ह शब्द वापरले. मला कॉल का केला? तुमची लायकी नाही कॉल करायचा, अशाप्रकारे अधिकाऱ्याने शेतकऱ्याला संभाषणात म्हटले. देशमुख यांनी वारंवार समजावून सांगण्याचा अधिकाऱ्याला प्रयत्न केला. मात्र कृषी सहाय्यक गई यांनी देशमुख यांचे काहीही ऐकून न घेता त्यांच्याशी अपमानजनक भाषेत बोलणे सुरूच ठेवले.

अवमानजनक भाषा वापरल्याचा महिला कृषी अधिकाऱ्यावर आरोप

हेही वाचा-एकनाथ खडसे यांनी शिवसेनेत यावं, मी मध्यस्थी करेन; शिवसेना आमदारांचे वक्तव्य

जर सरकारी अधिकारी शेतकर्‍यांना अशाप्रकारे उद्धटपणाची वागणूक देत असेल तर वरिष्ठांनी त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी देशमुख यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्जातून केली आहे. अन्यथा न्यायासाठी लोकशाही मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा-'राष्ट्रवादी काँग्रेसचे विसर्जन करून, पवारांना काँग्रेस अध्यक्ष करावे'

कृषी सहाय्यक अधिकारी ज्योती समाधान गई यांच्याकडून माहिती घेतली असता त्या म्हणाल्या की, शेतकरी मुकुंद देशमुख व्यक्तिशः लाभ घेण्यासाठी दबाव टाकतात. मी एक महिला अधिकारी आहे. माझीही सहन करण्याची क्षमता आहे. जे नियमाप्रमाणे होईल, तेच मी करेन. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले.

Last Updated : Sep 5, 2020, 8:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details