महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ration Rice Seized In Buldana : काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला; साखरखेर्डा पोलिसांत गुन्हा दाखल

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथून चिखली येथे काळ्या बाजारात (Black marketing of ration grains) विक्रीसाठी जात असलेला रेशनचा ५० क्विंंटल तांदूळ पकडण्यात (Ration Rice Seized In Buldana) आला आहे. याप्रकरणी गाडी चालक विरोधात साखरखेर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल (case registered in police station) केला आहे. मेहकर येथून चिखलीकडे विक्रीसाठी रेशनचा तांदूळ जात असल्याची गुप्त माहिती पत्रकार रमेश चव्हाण यांना मिळाली. (Buldana Crime) चव्हाण यांनी याची माहिती मेहकर पुरवठा विभागाला (grain supply department) आणि साखरखेर्डा पोलिसांना देत रस्त्याने जाणाऱ्या राशनच्या गाडीला हिवरा आश्रम येथे थांबविले आणि दोन्ही विभागाच्या ताब्यात दिले. (Latest news from Buldana)

Ration Rice Seized In Buldana
रेशनचा तांदूळ पकडला

By

Published : Jan 4, 2023, 3:39 PM IST

बुलडाणा :यावेळी पुरवठा विभागाने गाडी चालकाला विचारणा केली (Black marketing of ration grains) असता गाडी चालक गाडी सोडून फरार झाला. पुरवठा विभागाची खात्री झाल्यावर (grain supply department) पकडलेला तांदूळ हा राशनच असल्याची खात्री झाली (Ration Rice Seized In Buldana). गाडी चालकांविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे(case registered in police station).

रेशनचा तांदूळ पकडला

धान्याची काळाबाजारी थांबेना :राशनचा होणारा काळाबाजार हा काही नवीन नाही. मागील कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने स्वस्त धान्य दुकानदारामार्फत मोफत धान्य वाटप सुरू केले होते. ते मागील दोन वर्ष सतत देण्यात आले; परंतु शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांचा रेटा हे मोफत धान्य मिळावे यासाठी आंदोलने निवेदने दिल्यानंतर हे धान्य पूर्ववत सुरू करण्यात आले. असे असताना प्रशासनाने स्वस्त धान्य किंवा मोफत मिळणाऱ्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी ई पॉज मशीन आणली. परंतु ती देखील या काळ्या बाजाराला रोखू शकले नाही. अजूनही सर्रासपणे स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याची उदाहरणे सातत्याने समोर येत आहेत. यातीलच हा एक प्रकार समोर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details