बुलडाणा-प्रकल्पबाधीत शेती मुलाच्या नावावर बक्षीस पत्रानुसार करून देण्यासाठी एक हजाराची लाच स्वीकारणारा जिल्हा पुर्नवसन
कार्यालयातील अव्वल कारकून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संध्याकाळी करण्यात आली आहे. कांतीलाल जाधव असे अटकेतील कारकुनाचे नाव आहे.
खामगाव तालुक्यातील तक्रारदार शेतकऱ्याची शेती जीगाव प्रकल्पाच्या क्षेत्रात येत आहे. या शेतापैकी काही जमीन आर शेती जिगाव प्रकल्पासाठी राखीव आहे. खराब वगळता लागवड योग्य क्षेत्रातून काही शेती मुलाच्या नावावर बक्षीस पत्र करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार शेतकऱ्याने अव्वल कारकून जाधव याच्याकडे केली होती. परंतु ही परवानगी देण्यासाठी अव्वल कारकुन कांतीलाल मांगीलाल जाधव (वय ५१) याने तक्रारदार शेतकऱ्याकडे एक हजार रुपयाची मागणी केली. त्यानंतर शेतकऱ्याने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली.
हेही वाचा-दस्त नोंदणीकरता पाच लाखांच्या लाचेची मागणी; दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात