बुलडाणा - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. आज जिल्ह्यात नवीन ८ कोरोनाबधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबधित रुग्णाची संख्या आता ६७ झाली आहे.
बुलडाण्यात आज नवीन ८ कोरोनाबधितांची भर, एकूण रुग्ण ६७
जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार २७४ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर जिल्ह्यात एकूण ६७ कोरोनाबाधित आहेत.
बुलडाणा कोरोना बातमी
जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार २७४ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर जिल्ह्यात एकूण ६७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर आतापर्यंत तीन कोरोनाबधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत बरे झालेल्या ३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या रुग्णालयात ३१ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज (१ जून) ४६ अहवाल प्राप्त झाले असून १४ अहवाल प्राप्त झालेले नाहीत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.