महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 13, 2020, 7:00 PM IST

ETV Bharat / state

बुलडाण्यात आणखी तीन कोरोनाबाधितांची नोंद; एकूण संख्या ११३

बुलडाणा जिल्ह्यात आज तीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले. आज सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये लोणार तालुक्यातील ब्राम्हण चिकना येथील 25 वर्षीय तरुणी आणि भुमराळा येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर खामगाव तालुक्यातील जनुना येथील 34 वर्षीय पुरुषाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Corona Positive
कोरोना पॉझिटिव्ह

बुलडाणा - जिल्ह्यात आज आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. या तीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 113 झाली आहे. शुक्रवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी 35 अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी 32 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून तीन अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

आज सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये लोणार तालुक्यातील ब्राम्हण चिकना येथील 25 वर्षीय तरुणी आणि भुमराळा येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर खामगाव तालुक्यातील जनुना येथील 34 वर्षीय पुरुषाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 113 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद आहे. यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 77 रूग्ण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत. सध्या रूग्णालयात 32 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ३८ कोरोना चाचणी अहवालांची प्रशासनाला प्रतिक्षा आहे. असलेले नमुने 38 आहेत. आत्तापर्यंत तपासणी झालेल्यापैकी 1 हजार 711 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details