बुलडाणा- जिल्ह्यातील मलकापूरजवळ आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भरधाव ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. विश्वास संबाराव देवसरकर (वय ३५), असे मृताचे नाव आहे.
नांदेडातील भाविकांच्या कारचा बुलडाण्यात अपघात; १ ठार, ३ जखमी - अपघात
नांदेडमधील दादगाव येथील भाविक कारने अजमेर येथे जाण्यासाठी निघाले होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरघाव ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक झाली.
नांदेडमधील दादगाव येथील भाविक कारने अजमेर येथे जाण्यासाठी निघाले होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरघाव ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक झाली. वडनेरभोलजी जवळील ठाकुर पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झाला. यामध्ये गजानन शंकर देवसरकर, लक्षण किसन देवसरकर, भारत किसनराव देवसरकर, चंद्रमणी मेहसराम सावनकर हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मलकापूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींमध्ये कुणाचा हात तर कुणाचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.