भंडारा - कोरोनाच्या प्रादुर्भावाबरोबर आता जिल्ह्यावसीयांना सामना करावा लागत आहे तो सुर्यनारायनाचा. मागील 3 दिवसांपासून तापमानात अचानक वाढ झाली आहे. तापमान 40 डिग्रीवरून 45 डिग्रीपर्यंत पोहोचला आहे. यामुळे जिल्ह्यात दुपारच्या सुमारास अघोषीत संचारबंदी पाहायला मिळत आहे.
भंडारा जिल्ह्याच्या तापमानात अचानक वाढ, पारा पोहोचला 45 डिग्रीवर
कोरोनाच्या प्रादुर्भावाबरोबर आता भंडारा जिल्ह्यावसीयांना सामना करावा लागत आहे तो सुर्यनारायनाचा. मागील 3 दिवसांपासून तापमानात अचानक वाढ झाली आहे.
दरवर्षी एप्रिल महिन्यापासूनच तापमानात वाढ होत जाते. मात्र, यावर्षी मे महिन्याच्या 20 तारखेपर्यंत तापमान हे 40 डिग्रीपर्यंत होते. मात्र, 20 तारखेपासून तापमानात अचानक वाढ झाली. शनिवारी तापमान 45 डिग्रीपर्यंत गेले आहे. तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे उन्हाच्या चटक्यापासून सुटका मिळावी म्हणून, दुपारी एक वाजेनंतर लोकांनी घराबाहेर निघणे बंद केले आहे. ज्या नागरिकांना आवश्यक काम असेल तरच ते घराबाहेर निघत आहेत. यामुळे शहरातील नेहमी गजबजलेल्या चौकातसुद्धा मोजकेच नागरिक दिसत आहेत.
तापमान यापुढेही असेच वाढलेले असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे बऱ्याच घरी कुलर उशिरापर्यंत लावले गेले नव्हते. मात्र, उन्हाची दाहकता एवढी वाढली की, आता संपूर्ण दिवसभर नागरिकांना कुलरच्या हवेमध्ये राहावे लागत आहे. कोरोना आणि उन्ह अश्या दुहेरी कचाट्यात नागरीक सापडले आहेत.